Agriculture news in Marathi Unprecedented response to 'curfew' in Vidarbha | Page 2 ||| Agrowon

विदर्भात ‘कर्फ्यू’ला अभूतपूर्व प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

नागपूर ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला विदर्भात सर्वदूर व्यापक प्रतिसाद मिळाला. पूर्व तसेच पश्‍चिम विदर्भातील सर्वच शहर आणि गावांमधील रस्त्यांवर यानिमित्ताने शुकशुकाट अनुभवण्यात आला.

नागपूर ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला विदर्भात सर्वदूर व्यापक प्रतिसाद मिळाला. पूर्व तसेच पश्‍चिम विदर्भातील सर्वच शहर आणि गावांमधील रस्त्यांवर यानिमित्ताने शुकशुकाट अनुभवण्यात आला. 

उपराजधानी नागपूरमध्ये खबरदारीच्या उपायांतर्गत प्रशासनाकडून आधीच लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या परिणामी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठान बंद करण्यावर भर दिला गेला आहे. रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यूची त्याला जोड मिळाली. नागपुरातील अत्यंत गजबजेल्या भागात यामुळे शुकशुकाट पसरला होता. 

ऑटो रिक्षा सेवाही प्रभावीत झाल्याने रेल्वे, विमानाने बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच फरपट झाली. पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, दुर्गम भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्येही कर्फ्यूला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे अनुभवता आले. 

भाजीपाला, दूध या व्यावसायिकांना बंदमधून वगळण्यात आले असले, तरी त्यांनी देखील कर्फ्यूत सहभाग घेतला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल पंप वगळता इतर व्यवसाय १०० टक्‍के लॉकडाउन होते.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...
पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा...पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसाननांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
लातुरात किराणा दुकानांतून होणार...लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू...
परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू...परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे...
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...