नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तुरीसह रब्बी पिकांवर अवकाळी संकट

गुरुवारी रात्री तासभर जोरदार पाऊस झाला. पावसाळी वातावरण आहे. पाऊस सुरू राहिला, तर काढणीस आलेली तूर, फुलोऱ्यातील हरभऱ्याचे नुकसान होणार आहे. - तिरुपती कनकंटे, शहापूर,ता. देगलूर, जि. नांदेड. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तुरीचे नुकसान झाले. हरभरा तसेच लिंबू फळबागेत फूलगळ होऊन फटका बसला. - श्याम अंभुरे, डकळस, ता. पूर्णा, जि. परभणी.
 unseasonable rain Crisis on Rabi crops in Nanded, Parbhani and Hingoli districts
unseasonable rain Crisis on Rabi crops in Nanded, Parbhani and Hingoli districts

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तूर काढणी हंगाम संकटात आला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मांडवी (ता. किनवट) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवेळी पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन काढणी, कापूस वेचणी सुरू असताना नुकसान झाले. त्याप्रमाणे गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. तुरीची सुगी तसेच रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. 

कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी, हरभरा आदी पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे हरभऱ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भावदेखील होऊ शकतो. माहूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परभणी तसेच अन्य तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यतील अनेक मंडळातही पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी.) 

नांदेड जिल्हा ः माहूर ३५, वानोळा १३, वाई बाजार ५४, सिंदखेड ४३, किनवट ३२, मांडवी ६८, दहेली ५, शिवणी ६, अर्धापूर ८, दाभड ६, मालेगाव १५, मुगट ३, बारड ७, हदगाव, तामसा ९, मनाठा १०, पिंपरखेड ५, आष्टी ७, निवघा २, तळणी २, हिमायतनगर ६, सरसम ५, जवळगाव १७, भोकर १९, किनी ९, गोलगाव १५, धर्माबाद १६, जारिकोट १८, करखेली १२ बिलोली १५, आदमपूर ६, लोहगाव ५, सगरोळी ६, कुंडलवाडी १३, देगलूर २३, खानापूर ११, शहापूर ८, मरखेल २९, मालेगाव १७, हणेगाव ८, जांब १०, मुक्रमाबाद १६, सोनखेड ५, कापसी २, नांदेड ५, वजीराबाद ६, लिंबगाव १६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com