agriculture news in marathi, unseasonal rain causes damage to crops | Agrowon

राज्यात अवकाळी पावसाने नुकसान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मार्च 2019

पुणे : उन्हाचा चटका वाढून, उकाडा असह्य होत असताना सोमवारी (ता. २५) दुपारनंतर नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत वादळी वारे, गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, हळद, टोमॅटोसह अन्य भाजीपाला, आंबा, संत्री, डाळिंब, चिकू, द्राक्ष, केळी आदी फळपिकांना फटका बसला आहे. 

नगर जिल्ह्यातील नगर आणि कर्जत तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके व फळांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दुष्काळात टॅंकरने पाणी आणून जगवलेल्या आंबा, संत्री, डाळिंब, चिकू आदी फळबागांमध्ये वाऱ्यामुळे फळगळ झाली.  

पुणे : उन्हाचा चटका वाढून, उकाडा असह्य होत असताना सोमवारी (ता. २५) दुपारनंतर नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत वादळी वारे, गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, हळद, टोमॅटोसह अन्य भाजीपाला, आंबा, संत्री, डाळिंब, चिकू, द्राक्ष, केळी आदी फळपिकांना फटका बसला आहे. 

नगर जिल्ह्यातील नगर आणि कर्जत तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके व फळांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दुष्काळात टॅंकरने पाणी आणून जगवलेल्या आंबा, संत्री, डाळिंब, चिकू आदी फळबागांमध्ये वाऱ्यामुळे फळगळ झाली.  

सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असतानाच, सोमवारी सायंकाळी उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, सांगोला भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब व आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली. हनुमंतगाव (ता. सांगोला) येथील शेतकरी उत्तम दत्तू खांडेकर यांच्या झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. अनगर (ता. मोहोळ) परिसरातील खंडोबाचीवाडी भागात तुफानी गारांचा पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. केळी बागांसह काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, हळद आदी पिके, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. वेगावान वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मळणी करून, शेतात वाळवत ठेवलेले गहू, हरभऱ्यासह, हळद, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांना फटका बसला. अचानक वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूर, सांगलीत गारांसह पावसासह जोरदार सरी कोसळल्या.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...