शेतकरी उत्पादक गटांना बिनव्याजी कर्जपुरवठा : नरेंद्र पाटील

शेतकरी उत्पादक गटांना बिनव्याजी कर्जपुरवठा ः नरेंद्र पाटील
शेतकरी उत्पादक गटांना बिनव्याजी कर्जपुरवठा ः नरेंद्र पाटील

मल्हारपेठ, जि. सातारा ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत महामंडळामार्फत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा होणार आहे. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेतही कर्जपुरवठा होणार आहे. आर्थिक मागास घटकातील शेतकऱ्यांसाठी ही योजना फलदायी ठरणार आहे. बिनव्याजी कर्जपुरवठा आणि व्याज परतावाही मिळणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

अभियानांतर्गत विविध वैयक्तिक कर्ज व गट प्रकल्प कर्ज योजना कार्यान्वित झाली आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुणांना महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर १), गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-२), गट कर्ज प्रकल्प योजना (एफपीओ-जीएल-१) या तीन योजना राबविण्यात येत आहेत. आर्थिक मागास घटकातील इच्छुक तरुण अथवा गटांनी नोंदणी करताना शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करावेत. यानंतर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र संबंधित नोंदणीकृत बॅंकेत देऊन स्वतः मंजूर करून घ्यावे. बॅंकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून कर्जदाराच्या खात्यात जमा होईल. पाटण तालुक्‍यातील जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी किंवा संयुक्त गटाच्या शेतकऱ्यांना या कर्ज प्रकरणाचा लाभ मिळणार आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमासाठी, लघू व मध्यम उद्योगासाठी देय आहे. यासाठी पात्र लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी, आधार कार्ड लिंक असणे, वय १८ ते ४५, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या मर्यादेत असावे, दिव्यांग उमेदवाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. कर्ज प्रकरणासाठी आयबीआयएल प्रणालीचे सदस्य असणाऱ्या बॅंकेत असणे अनिवार्य आहे, तर गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेसाठी शासनमान्य बचत गट भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले अथवा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकृत केलेल्या किंवा कंपनी शासन नोंदणीकृत आणि गटातील सदस्याने अर्ज करतेवेळी यापूर्वी इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

गटातील किमान एक सदस्य दहावी पास असावा. हे कर्ज मुदत कर्ज असते. गट पात्र झाल्यानंतर ठरलेल्या गटांना ऑनलाइन मंजुरीपत्र दिले जाते. यानंतर वैधानिक कागदपत्रे, तारणपत्र पूर्ण केल्यावर संपूर्ण रक्कम गट कर्ज खात्यात जमा होते. विनव्याजी कर्ज रक्कम परतावा खात्यात सात महिन्यांपासून ८४ महिन्यांपर्यंत म्हणजे सात वर्षांत समान हप्त्याने देणे अनिवार्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com