'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला समर्पित करणे अन्यायकारक' 

राज्य शासनाची आर्थिक वित्तीय तुट भरून काढण्यासाठी अखर्चित निधी शासनाला समर्पित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने २१ मार्च रोजी घेतला असून त्याबाबत निर्देश दिले आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले यांनी यांनी पत्रव्यवहार केला आहे. सर्वांनी वेळीच सर्तक व्हावे. अन्यथा ग्रामपंचायतीचा शिल्लक निधी शासन तिजोरीत जमा होणार. - डॉ. सूरज पाटील लोड, सरपंच तथा अध्यक्ष, सरपंच ग्रामसंसद महासंघ, अकोला
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला समर्पित करणे अन्यायकारक' 
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला समर्पित करणे अन्यायकारक' 

अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु उपाययोजनांमुळे शासनाचा मोठा निधी खर्च होत आहे. त्यामुळे निर्माण होणारी वित्तीय तूट लक्षात घेता शासनाने विविध मार्गांनी पैसा जुळविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना मिळालेल्या १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत स्तरावरील अखर्चित निधी ३१ मे पुर्वी शासनास समर्पित करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र हा प्रकार ग्रामपंचायतींसाठी अन्यायकारक होईल, असा आक्षेप सरपंच ग्रामसंसद महासंघाने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात केला आहे. 

ग्रामपंचायतींना केंद्रीय १४ वा वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्‍थांना त्यांच्या बळकटीकरणासाठी राज्याला सन २०१५ ते २०२० या आर्थिक पाच वर्षांसाठी निधी हा केवळ ग्रामपंचायत स्तरासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. कोरोनाची आपात्कालीन परिस्थिती उदभवल्याने ग्रामपंचायत पातळीवर प्राधान्य क्रमाची विकास कामे अपुर्ण स्‍थितीत आहेत. साहित्य खरेदी, कंत्राटदारास कामाचे बील अदा करणे प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग बँक खात्यात अखर्चित शिल्लक असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. असा शिल्लक निधी शासनास समर्पित करण्याबाबत तपशिल उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ग्रामपंचायतींना प्राप्त झालेला १४ वा वित्त आयोग अखर्चित निधी शासनास समर्पित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीवर अन्यायकारक होऊ नये. या निर्णयाच्या व अंमलबजावणीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com