agriculture news in marathi until next season Ethanol Project to start: Shete | Page 2 ||| Agrowon

पुढील हंगामापर्यंत इथेनॉल प्रकल्प सुरू होणार : शेटे

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

चिंचखेड, ता. दिंडोरी : `‘कादवा’नेही इथेनॉल प्रकल्पाची तयारी केली आहे. पुढील हंगामापर्यंत प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न राहील,’’ असे प्रतिपादन ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

चिंचखेड, ता. दिंडोरी : ‘‘‘कादवा’ला लेखापरीक्षनात ऑडिट वर्ग ''अ'' मिळाला आहे. केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पास चालना दिली आहे. ‘कादवा’नेही इथेनॉल प्रकल्पाची तयारी केली आहे. पुढील हंगामापर्यंत प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न राहील,’’ असे प्रतिपादन ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. सभेसाठी सभासदांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन नोंदणी करत झूम मिटिंगद्वारे, युट्युब लाईव्हद्वारे सभेस उपस्थित राहत प्रश्न विचारत सूचना मांडल्या. यावेळी प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, सचिन बर्डे, प्रकाश शिंदे, विजय वाघ, प्रा. विनायक काळे, शिवाजी शिंदे यांनी चर्चेत भाग घेत प्रश्न विचारले.

सचिन बर्डे म्हणाले, ‘‘इथेनॉल प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, ऊस उत्पादकांना विश्वासात घेऊन प्रकल्प व्हावा. प्रस्तावित इथेनॉल प्रकल्पासाठी ऊस बिलातून कपात करू नये. सर्व सभासदांकडून ऐच्छिक ठेव घ्यावी, ऊस तोड वाढवावी.’’ 

प्रकाश शिंदे म्हणाले, ‘‘सर्व सभासदांकडून ठेवी घ्याव्या. बिगर ऊस उत्पादक सभासदांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. ऊस उत्पादकांना सभासद करावे.’’ प्रा. विनायक काळे यांनी काळाची पाऊले ओळखत ‘कादवा’ने विस्तारीकरण करत इथेनॉल प्रकल्प हाती घेतल्याबाबत अभिनंदन करत सर्वतोपरी सहकार्य करावे.’’  

बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, जि.प सदस्य भास्कर भगरे, राज्य बँकेचे अधिकारी देविदास गायकवाड, संजय पडोळ, राजेंद्र ढगे आदींनी भाग घेतला.
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...