नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार हेक्टरवर पिकांना फटका

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. ज्यामध्ये ३३ टक्क्यांवरील नुकसान ग्राह्य धरले आहे.
Untimely crop failure on 2,000 hectares in Nashik district
Untimely crop failure on 2,000 hectares in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. ज्यामध्ये ३३ टक्क्यांवरील नुकसान ग्राह्य धरले आहे.

जिल्ह्यात २ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार ‘एनडीआरएफ’च्या दरानुसार ३ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईबाबत अपेक्षित निधी राज्य सरकारला कळविला आहे.

१८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळीच्या तडाख्यात रब्बी हंगामातील शेती पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या पंचनाम्यात सटाणा, निफाड व दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. जिल्ह्यात १८७ गावांमध्ये हे नुकसान आहे. ३ हजार ४७९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान बागायती पिकांमध्ये कांद्याचे आहे. या शिवाय हरभरा व मका पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, बहुवार्षिक फळपिकामध्ये द्राक्षाचे सर्वाधिक नुकसान आहे. काही प्रमाणात आंबा, डाळिंब व बोरांचे नुकसान झाले. तर जिरायती पिकांमध्ये हरभऱ्याचे काहीसे नुकसान झाले आहे.

सटाणा तालुक्यात कांद्याला फटका बसला. तर द्राक्ष पिकास दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण, येवला व सिन्नर तालुक्यात दणका बसला. गहू पिकाचे निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर व येवला तालुक्यातही नुकसान आहे.

जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, बागायती व वार्षिक फळपिकांसाठी १३ हजार ५००, तर बहुवार्षिक फळ पिकांसाठी १८ हजार रुपये मदत निश्चित करण्यात आली आहे. सरकारने मदत जाहीर केल्यास मिळणार आहे. मात्र नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com