मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे नुकसान

औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवेळी पाऊस व गारपिटीमुळे मराठवाड्यातील १६ तालुक्यातील ३३२ गावे, शिवाराला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Untimely in Marathwada 33% crop damage
Untimely in Marathwada 33% crop damage

औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवेळी पाऊस व गारपिटीमुळे मराठवाड्यातील १६ तालुक्यातील ३३२ गावे, शिवाराला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जवळपास ४५ हजार ५३५ हेक्टर जिरायत, बागायत व फळ पिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी १६ हजार २५९ हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे. 

सततच्या पावसामुळे आधी खरिपाचा हंगाम मोठ्या प्रमाणात हातचा गेला. तर रब्बीचीही पेरणी लांबण्यासह कीड-रोगांच्या नैसर्गिक संकटामुळे चांगलीच वाताहत झाली. या सर्व संकटातून वाचलेल्या रब्बी पिकांना व फळपिकांना अवकाळीचा तडाखा बसला. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ९ पैकी ५ तालुक्यांतील १३४ गावांत नुकसान झाले. त्यामध्ये ८९०९ हेक्टरवरील जिरायत, २८ हजार ७७१ हेक्‍टरवरील बागायत, तर ५६५ हेक्टरवरील फळपिकांचे मिळून ३८ हजार २४५ हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. 

जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यातील ४२ गावांत नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ५६८.६३ हेक्‍टरवरील बागायत व फळपिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील एका तालुक्यातील ३८ गावांत पिके बाधित झाली. २१५२ हेक्टर बाधित क्षेत्रात १९२८ हेक्‍टरवरील जिरायत  २१४ हेक्‍टरवरील बागायत क्षेत्राचा समावेश आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात गारपीट व वीज अंगावर पडल्याने ५ व्यक्ती जखमी झाल्या. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. एक लहान व तीन मोठे जनावरे मृत्यूमुखी पडली. बीड जिल्ह्यातील ३ तालुक्यातील ६७ गावांत फटका बसला.

यामध्ये २२ लहान व एक मोठे जनावर मृत्युमुखी पडले. तर ३३४९ हेक्टर क्षेत्राचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. त्यापैकी ११०३ हेक्‍टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात ६७१ हेक्‍टरवरील जिराईत, ३४१ हेक्‍टरवरील बागायत तर ९१ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. 

उस्मानाबादमध्ये ५१ गावांत नुकसान  

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५१ गावांत नुकसान झाले. ९ मोठ्या जनावरांचा, तर ४ लहान जनावरांचा मृत्यू झाला. १२२१ हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. यापैकी १३० हेक्‍टरवरील फळपिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले. पंचनाम्याअंती अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com