जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
बातम्या
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील पिकाला फटका
पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड आणि जुन्नर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड आणि जुन्नर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात एकूण १०८.४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे ४४७ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, हे मोठे नुकसान झाले असल्याचे नजर अंदाजाच्या अहवालावरून समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतचा नजर अंदाजाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीची माहिती घेतली. त्यावरून या दोन तालुक्यांतील पिकांच्या नुकसानीची माहिती पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नसले तरी बागायती क्षेत्रावरील पिके आणि फळपिके मिळून सुमारे १०८.४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नजर अंदाजाद्वारे १६ लाख १३ हजार २५ रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून, या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत.
रब्बी पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे. खेड व जुन्नर तालुक्यातील अनेक भागात कमी अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, द्राक्षे, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकांचे झाले आहे. सुमारे २० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ ज्वारी पिकांचेही ३५.५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. या शिवाय, टोमॅटो, बाजरी, ज्वारी, भाजीपाला, फळपीके, कलिंगडे, फुलपीकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.
अवकाळी पावसामुळे पीकनिहाय झालेले नुकसान, हेक्टरमध्ये
पीक | नुकसानीचे क्षेत्र, हेक्ट | शेतकरी संख्या |
कांदा | २०.०० | ५० |
हरभरा | १०.९५ | ७१ |
ज्वारी | ३५.५० - | १४१ |
गहू - | १०.९५ | ७१ |
- 1 of 1580
- ››