Agriculture news in marathi Untimely rain with wind in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (ता. ६) सायंकाळी उशिरा वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आंबोली (ता. सावंतवाडी) परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चांगलीच तारांबळ उडाली.

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (ता. ६) सायंकाळी उशिरा वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आंबोली (ता. सावंतवाडी) परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. 

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. दरम्यान, सायकांळी उशिरा आंबोली परिसरात विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने आंबोली परिसराला झोडपून काढले. त्यामुळे सर्वांची धांदल उडाली. 

आंबोली पाठोपाठ सावंतवाडी तालुक्यातील माजगाव, माडखोल व इतर ग्रामीण भागात देखील मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. कुडाळ, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागांत तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले. 

सध्या या परिसरातील आंबा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. तर काजू हंगाम ऐन रंगात आला आहे. झाडाखाली मोठ्या प्रमाणात काजू पडलेल्या आहेत. पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज सकाळी देखील जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून, वातावरणातही उष्म्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आजदेखील पाऊस पडेल अशी भीती बागायतदारांच्या मनात आहे.  
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...