शक्तिप्रदर्शन टाळून नाशिकमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज

शक्तिप्रदर्शन टाळून नाशिकमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज
शक्तिप्रदर्शन टाळून नाशिकमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज

नाशिक : राज्यात पडलेला दुष्काळ, गेल्या पाच वर्षांतील पाणीटंचाई, शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, सीमेवरील तणाव, बेरोजगारी आदी प्रश्नांना जनता तोंड देत आहे. त्यामुळे कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे नाशिकमधील उमेदवार समीर भुजबळ, दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी बुधवारी (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल केले.

सर्वसामान्य शेतकरी, खेळाडू, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी, शहीद सैनिकांची पत्नी, तरुण आणि तरुणींना सोबत घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अर्ज भरण्यापूर्वी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले. या वेळी महिला खेळाडू कोमल जगदाळे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी मंजुळा धनगर, शहिद सैनिकाच्या पत्नी यशोदा गोसावी, कु. कल्याणी अहिरे उपस्थित होत्या. 

महाले यांनी खेळाडू पूनम दिनकर सोनुने, सुशिक्षित बेरोजगार तरुण आदेश बोडके, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, युवक विलास निरगुडे यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉ. तुषार शेवाळे, अॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधूने, शरद आहेर, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणीटंचाई, वाढती महागाई, सीमेवरील तणाव इत्यादी गंभीर प्रश्नांचा सामना नागरिक करत आहेत. त्यामुळे शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीत विजयी होऊ.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com