अकोला जिल्ह्यातील ९४०३३ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड

अकोला जिल्ह्यातील ९४०३३ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड
अकोला जिल्ह्यातील ९४०३३ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड

अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या याद्या शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया शनिवारपासून (ता.१) सुरुवात करण्यात आली असून, आता या कामाने गती घेतली आहे. पहिल्या चारच दिवसांत अपलोड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९४ हजारांवर पोचली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात येतील, त्यातील आयडी नंबरद्वारे पोर्टलवर आधार ऑथेंटिकेशन करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळविता येऊ शकेल. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ५८० शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. यांपैकी काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याचे काम झाले नव्हते. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत निकष, अटीनुसार जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ५८० शेतकरी कर्जमुक्ती साठी पात्र ठरतील असा अंदाज आहे.  त्यांपैकी जिल्हा सेवा सहकारी संस्थेचे ५२ हजार ६८८ शेतकऱ्यांचे ३५० कोटी, तर शेतकऱ्यांना कर्ज वितरित केलेल्या राष्ट्रीयीकृत व खासगी, अशा २४ बँकेच्या ६१ हजार ८९२ कर्जधारक शेतकऱ्यांना ४२५ कोटी, असा एकूण ७७५ कोटीच्या कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासकीय पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.  मंगळवार (ता. ४) पर्यंत ९४ हजार ३३ शेतकऱ्यांची नावे अपलोड केली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com