सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची यादी अपलोड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार ६९१ शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पाच लाख ४३ हजार ९१७  शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. 

या योजनेतून पात्र शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍याने बाजी मारली आहे. या तालुक्‍यांतील सर्व पात्र शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍याचे काम सर्वांत कमी आहे. या तालुक्‍यातील १० हजार ४३६ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

एकूण जिल्ह्याची कामगिरी ९४.६५ टक्के एवढी आहे. ३० हजार ७७४ शेतकऱ्यांची माहिती अद्यापही अपलोड करणे बाकी आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक ८४ हजार २०० शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. माळशिरस तालुक्‍यातील एक लाख ४६ हजार शेतकऱ्यांपैकी ७३ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित ७२ हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. 

पंढरपूर तालुक्‍यातील एक लाख २६ हजार शेतकऱ्यांपैकी ५२ हजार शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरले आहेत. किती शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत निधी जमा झाला आहे, याबाबतची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध होत नसल्याने या योजनेतून आतापर्यंत किती जणांना प्रत्यक्षात लाभ झाला आहे, किती शेतकरी सन्मान निधीपासून वंचित आहेत, याबाबतची स्पष्टता जिल्हा स्तरावर नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com