राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपये

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत धान्य बाजारामध्ये (भूसार माल मार्केट) बुधवारी (ता.१५) उडदाची ९५ क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटल किमान ५१९० ते कमाल ६००० रुपये, तर सरासरी ५५९५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Urad 3301 to 7010 ruees
Urad 3301 to 7010 ruees

हिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत धान्य बाजारामध्ये (भूसार माल मार्केट) बुधवारी (ता.१५) उडदाची ९५ क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटल किमान ५१९० ते कमाल ६००० रुपये, तर सरासरी ५५९५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील धान्य बाजारात यंदाच्या हंगामातील उडदाची स्थानिक परिसरातून आवक सुरु झाली आहे. सध्या आठवड्यातील दोन तीन दिवसाआड आवक होत आहे. शनिवारी (ता.११) उडदाची ९ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ५४०१ रुपये, तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.९) एकूण १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३५०० ते ५३०१ रुपये, तर सरासरी ४४०० रुपये मिळाले. बुधवारी (ता.८) एकूण ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५८०० ते ६३९० रुपये तर सरासरी ६०९५ रुपये दर मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.

अकोल्यात  क्विंटलला५००० ते ६१०० रुपये 

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला ५००० ते ६४०० दरम्यान दर मिळाला. सरासरी ६१०० रुपये प्रतिक्विंटलला दर होता. सध्या उडदाची आवक कमी होत असल्याने दरामध्ये चढ-उतार होत असल्याचे बोलले जाते.

या हंगामातील उडदाची काढणी लवकरच वेगाने सुरु होणार आहे. काही ठिकाणी काढणी झाली. नवीन उडीद अद्याप तुलनेने विक्रीसाठी जास्त प्रमाणात आलेला नाही. बुधवारी (ता.१५) अकोल्यात उडदाचा किमान दर ५००० व कमाल ६४०० एवढा होता. सरासरी ६१०० रुपये दर मिळाला. तर एकदिवस आधी म्हणजेच मंगळवारी (ता.१४) उडीद ४३०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटलने विकला गेला. सरासरी ४५०० रुपयांचा दर होता. या दिवशी १०३ पोत्यांची आवक झाली. या आठवड्यात उडदाच्या सरासरी दरात दररोज फरक दिसून येत आहे. बाजारात आवकच पुरेशी नसल्याने हे दर खाली-वर होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागपूर, अमरावतीत उडदाची आवक घटली

\नागपूर :  नागपूर व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये मूग, उडदाचा पेरा कमी असतो. त्याच्या परिणामी बाजारातील आवक देखिल कमी राहते, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सप्टेंबर महिन्यात दोन तारखेचा अपवाद वगळता उडिदाची किलोभरही आवक नोंदविण्यात आली नाही. 

दोन सप्टेंबर रोजी बाजारात तीन क्विंटल इतकी आवक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या उडदाला ४७०० ते ४९०० रुपयांचा दर मिळाला. अमरावती बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उडदाची आवक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दररोज सरासरी १० ते १५ क्विंटल अशी अल्प आवक अमरावती बाजार समितीत होते. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी मूग, उडीद ऐवजी सोयाबीनला पसंती दिली आहे. परिणामी, उडदाचा पेरा कमी झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अमरावती बाजार समितीत देखील आवक घटल्याचे सांगण्यात आले.

जालन्यात क्विंटलला ५८०० ते ६५०० रुपये

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात उडदाची जवळपास चार वेळा आवक झाली. त्यास सरासरी ५८०० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाच्या आवकेत चढ-उतार कायम आहे. १० सप्टेंबरला ८६ क्विंटल आवक झालेल्या उडदाला सरासरी ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ११ सप्टेंबरला १६० क्विंटल आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ सप्टेंबरला १५० क्विंटल आवक झालेल्या उडदाला सरासरी ६४०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर, १५ सप्टेंबरला १३२ क्विंटल आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ५८०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

लातुरात तीन वेळा आवक

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात उडदाची तीन वेळा आवक झाली. ९ सप्टेंबरला २६१२ क्विंटल आवक झालेल्या उडदाला सरासरी ६ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. १४ सप्टेंबरला २ हजार ५९५ क्विंटल उडदाची आवक झाली. त्याचे सरासरी दर ६ हजार ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ सप्टेंबरला ३ हजार ३४१ क्विंटल आवक झालेल्या उडदाला सरासरी ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नांदेडमध्ये क्विंटलला ६००० ते ७१०० रुपये  नांदेड : जिल्ह्यातील देगलूर बाजारात सध्या उडदाला दर ६००० ते ७१०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. बाजारात सध्या ४५० ते ५०० क्विंटल उडदाची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यात देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, नायगाव या तालुक्यात उडीद तसेच मुगाची लागवड होते. 

नांदेड बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मात्र उडदाची लागवड नसल्याने नांदेड बाजार समितीमध्ये आवक नाही. देगलूर बाजारात सध्या उडदाची आवक सर्वसाधारण आहे. दिवसाला ४५० ते ५०० क्विंटल आवक होत आहे. यास सध्या कमाल ७१००, किमान ६८०० तर सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली. दरम्यान यंदा उडदाची खेडा खरेदी वाढल्यामुळे बाजारातील आवकेवर परिणाम झाल्याची माहिती व्यापारी गणेश कोटगीरे यांनी दिली.

लासलगावात क्विंटलला ३३०१ ते ५६७५ रुपये 

नाशिक : जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१५) उडदाची आवक अवघी ३ क्विंटल झाली. त्यास  प्रतिक्विंटल ३३०१ ते ५६७५ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता.१४) आवक ५ क्विंटल झाली. त्यास  ५००० ते ५४८० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४०० राहिला. सोमवारी (ता.१३) आवक ३ क्विंटल झाली. त्यास ४००१ ते ६२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५६०१ रुपये मिळाला.

रविवारी, शनिवारी व गणेश चतुर्थीच्या दिवशी आवक झाली नाही. गुरुवारी (ता.९) आवक ३ क्विंटल झाली. त्यास ४८०१  ते ६४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये राहिला. चालू महिन्यात शुक्रवारी (ता.३) सार्वत्रिक ७ क्विंटल आवक झाली. त्यास ५८०० ते ६१७१ असा दर मिळाला. 

सांगलीत क्विंटलला  ६५०० ते ७१०० रुपये

सांगली : सांगली बाजार समितीच्या जत येथील श्री विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवारात उडदाची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता. १६) उडदाची ४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते ७१००, तर सरासरी ६८०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती, जत बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात उडीद पेरणी केली जाते. या बाजार समितीत हंगाम सुरू झाला की आवक मोठ्या प्रमाणात होते. बुधवार (ता. १५) उडदाची ६० क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते ७२००, तर सरासरी ६७०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १४) उडदाची ४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते ७२००, तर सरासरी ६७०० रुपये असा दर होता.

सोमवारी (ता. १३) उडदाची १०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते ७२००, तर सरासरी ६७०० रुपये असा दर होता. जत तालुक्यात उडीद काढणी सुरू आहे. पुढील आठवड्यात उडदाच्या आवकेत वाढ होईल, पण दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com