Agriculture news in marathi Urad in Barshi Market Committee, Moog Guaranteed Shopping Center Approved | Agrowon

बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव खरेदी केंद्र मंजूर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामासाठी उडीद व मूग हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. 

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामासाठी उडीद व मूग हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. 

राऊत म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून बार्शी बाजार समितीत उडीद आणि मूगाची आवक वाढली आहे. पण, दर कमी मिळतो आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन आपण हे केंद्र मंजूर केले. सध्या उडदाला हमीभाव ६३०० रुपये व मूगाला ७१०० रुपये आहे. परंतु, ज्यादा आवक झाल्याने सध्या उडदाला बाजारात ४००० ते ५५०० रुपये आणि मूगाला ५००० ते ६००० रुपये दर मिळत आहेत. त्यासाठी हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी आपला आग्रह होता. 

बार्शी तालुक्‍यात यंदा सर्वाधिक उडदाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सध्या या केंद्रासाठी तुळजा भवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था मर्यादित उंबर्गे (ता. बार्शी) यांची नेमणूक करण्यात आली आहे. हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करताना पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा उतारा, पीक पेरा, बॅंकेचे पासबूक ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत. १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात नोंदणीही सुरु झाली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...