agriculture news in Marathi urad crop damaged over 8400 heactor Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात पावसाने उडदाचे ८४०० हेक्टरवर नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात या हंगामात मुगाच्या पिकापाठोपाठ उडीद पिकाचेही हजारो हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांकडून व्यक्त होत आहे.

अकोला ः जिल्ह्यात या हंगामात मुगाच्या पिकापाठोपाठ उडीद पिकाचेही हजारो हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. किडीचा प्रादुर्भाव, पाऊस यामुळे सुमारे ८४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. 

उडदाची या हंगामात सुमारे साडे पंधरा हजार हेक्टरवर लागवड झाली होती. त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावरील पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने या उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागणार आहे. खरिपात मूग, उडीद ही पिके नगदी पैसे मिळवून देणारी आहेत. त्यामुळे व कमी कालावधीत येत असल्याने शेतकऱ्यांची याकडे पसंती राहते. यंदाच्या हंगामात सुरुवातीला मुगाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर उडदावरही हीच कीड सक्रीय झाली. परिणामी, असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात उडदाच्या झाडावर शेंगाच लागल्या नाहीत. 

ही कीड मुगावर प्रामुख्याने तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर पसरली होती. त्यानंतर आता उडीद पिकाचेही याच तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले. शिवाय जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातही किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार ८४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उडीद पिकाचे नुकसान झाले. 

उत्पादकता एकरी ५० किलोपर्यंत
किडरोगांनी बाधित झालेल्या क्षेत्राशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या शेतात उडीद पीक शिल्लक राहले, त्यांनी काढणी सुरु केली आहे. अनेकांना एकरी ५० किलो ते एक क्विंटल दरम्यान उत्पादन येत आहे. कृषी खात्याच्या प्लॉटमध्ये सरासरी ५० किलोच्या आत उत्पादन मिळत असल्याचे समोर आले आहे. किडीपासून वाचलेले पीक गेल्या काळातील सततच्या पावसाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले. सध्या पावसात उघाड मिळताच शेतकऱ्यांनी पीक काढणीचे काम सुरु केले आहे. मात्र, उत्पादकता पाहून लावलेला खर्चही निघत नसल्याने चिंतेचा सूर उमटत आहे.

उत्पादकांना मदतीची प्रतीक्षा 
किडीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उदध्वस्त झाले. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदतीची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी विमा काढला असून कृषी खात्याने पंचनामे करीत नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...