कुर्डुवाडीत उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा ः शिंदे

सोलापूर ः कुर्डुवाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.
Urad guarantee in Kurduwadi Start a shopping center: Shinde
Urad guarantee in Kurduwadi Start a shopping center: Shinde

सोलापूर  ः माढा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात उडीद पेरणी झाली आहे. सध्या त्याची काढणी सुरू आहे. एकरी उताराही चांगला मिळत आहे. त्यामुळे शासनाने कुर्डुवाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. 

सध्या खासगी बाजारपेठेत उडदाची आवक वाढली आहे. व्यापाऱ्यांनी लगेच प्रतिक्विंटल दर पाच हजारांच्या आसपास आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उडदासाठी निर्धारित केलेला दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपये आहे.

हमीभाव मिळावा, यासाठी उडीद हमीभाव केंद्र सुरू करावा. सध्या कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ७०० ते ८०० क्विंटल उडदाची आवक होत आहे. पुढील काळात ही आवक आणखी वाढणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरित उडीद हमीभाव केंद्र सुरू करावे, असे शिंदे यांनीनिवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com