सोयाबीननंतर उडदालाही हमीभावापेक्षा अधिकचा दर

urad
urad

अमरावती ः सोयाबीननंतर आता उडदाने देखील हमीभावापेक्षा जादा दराचा पल्ला गाठला आहे. सोयाबीनला चार हजार रुपये तर उडदाला कमाल सहा हजार रुपयांचा दर खुल्या बाजारात मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  सोयाबीनची सर्वाधिक लागवड असलेल्या मध्यप्रदेशात यावर्षी संततधार पावसाचा फटका बसत उत्पादकता प्रभावित झाली. त्यामुळे सोयाबीन दरात तेजी अनुभवली जात आहे. सोयाबीनचे दर मध्यप्रदेशातील बाजारात ४ ते साडेचार हजार रुपयांवर पोचले आहेत. बियाण्याकामी असलेल्या सोयाबीनला उच्चांकी दर दिला जात आहे. महाराष्ट्रातील बाजारात देखील ४००० ते ४२०० रुपये क्‍विंटल दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत.  सोयाबीनंतर उडदाच्या दरातही सरासरी ३०० रुपयांची तेजी अनुभवली जात आहे. उडदाचा ५७०० रुपये क्‍विंटलचा हमीभाव आहे. शासनाने हमीभावाने खरेदीसाठी केंद्र उघडले. परंतु, उडदाचा दर्जा एफएक्‍यु नसल्याने या केंद्रावर खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे सुरुवातील मिळेल त्या भावात उडीद विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता मात्र आवक घटल्याने उडदाने बाजारात कमाल सहा हजार रुपयांचा पल्ला गाठला आहे. सुरुवातीला उडदाचे दर अवघे तीन ते साडेतीन हजार रुपयांचे होते, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. अकोला बाजार समितीत शुक्रवारी (ता. १०) उडदाला ४५०० ते ७५०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. शनिवारी (ता. ११) हे दर ४००० ते ६८०० रुपये क्‍विंटलवर आले होते. शनिवारी अकोला बाजारात ७० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com