सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीत

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उडीद, मुगाची आवक चांगली झाली. त्यांचे दरही वधारलेले राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Urad, Mug uprising, rate rising in Solapur
Urad, Mug uprising, rate rising in Solapur

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उडीद, मुगाची आवक चांगली झाली. त्यांचे दरही वधारलेले राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मुगाची आवक रोज २० ते ४० क्विंटल आणि उडदाची ७० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. दोन्हींचीही आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या पंधरवड्यापासून नव्या मूग आणि उडदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. सध्या त्यांना मागणीही वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या सुरवातीपासूनच दर बऱ्यापैकी मिळत आहेत. मुगाला प्रतिक्विंटलला किमान ५८०० रुपये, सरासरी ६५०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये, तर उडदाला किमान ६००० रुपये, सरासरी ६७०० रुपये आणि सर्वाधिक ७२०० रुपये दर मिळाला. 

कांदा आणि लसणालाही पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. लसणाची आवक मात्र वाढली. एक-दोन दिवसाआड ५० ते १०० क्विंटलपर्यंत त्याची आवक होती. लसणाला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये, कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये दर राहिला.

गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांच्या आवकेत आणि दरात मोठा चढ-उतार राहिला. पण या सप्ताहात त्यात किंचित सुधारणा झाल्याचे दिसून आले. या सप्ताहात मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते ११०० रुपये, शेपूला ३५० ते ५०० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. तर पालक आणि चुक्याला प्रत्येकी २०० ते ३५० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com