डडिद
डडिद

उडदालाही मिळेना हमीभाव

उडदाला प्रतिक्विंटलसाठी ५६०० चा हमीभाव आहे. तर मुगाला ६९७५ रुपये हमीभाव केंद्राने जाहीर केला. यापेक्षा कमी दरात खरेदी कशी सुरू आहे. हा प्रकार बंद व्हावा. शासनाने आपले हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत. - सोपान पाटील, नेते, राष्ट्रवादी किसान सभा

जळगाव ः मुगानंतर आता उडदाचे उत्पादन घरात आले आहे, त्यातच हमीभावाच्या मुद्द्यावरून ठप्प असलेले काही बाजार समित्यांचे कामकाज हवे तसे गतिमान झालेले नाही. परंतु जळगाव बाजार समितीत मात्र सोमवारी (ता. १०) मूग व उडदाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव झाले. या वेळी उडदाला केंद्राने प्रतिक्विंटल ५६०० रुपये दर जाहीर केला असताना, खासगी बाजारात ४००० ते ४५०० रुपये दर देण्यात आले.   

हमीभावापेक्षा कमी दरात कशी खरेदी करता येईल, असे बाजार समित्यांमधील अडतदार, व्यापारी यांनी म्हटले होते. जोपर्यंत शासन शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीची हमी देत नाही, तोपर्यंत बाजार समितीत खरेदी सुरळीत होणार नाही, असा पवित्राच जणू व्यापाऱ्यांनी घेतला होता. त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कमी दर्जाच्या शेतीमालाची (नॉन एफएक्‍यू) हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करता येईल. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे संमतीपत्र लिहून घ्यावे, असे स्पष्टपणे एका बैठकीत अडतदार, व्यापाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार सोमवारी जळगावात लिलाव पार पडले. ज्या शेतकऱ्यांचा मूग, उडीद हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला, त्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेण्यात आले. उडदाची सुमारे २०० क्विंटल तर मुगाची ३५० क्विंटल आवक झाली होती, अशी माहिती मिळाली. 

मंगळवारीही (ता. ११) लिलाव सुरू झाले. त्यात हमीभाव कुठल्याही शेतीमालास मिळू शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.  खानदेशातील नंदुरबार, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, चोपडा, शिरपूर या प्रमुख बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदी सुरू झाली असून, तेथेही संमतीपत्र लिहून घेऊन मूग व उडदाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले. 

व्यापाऱ्यांना हवीलेखी हमी यावल, चोपडा, चाळीसगाव, शहादा, शिरपूर येथील काही अडतदार, व्यापाऱ्यांनी आपल्याला शासनाने हमीभावापेक्षा कमी दरात शेतीमाल खरेदीसंबंधी लेखी हमी, परिपत्रक द्यावे, अशी भूमिका कायम ठेवली असून, लिलावात सहभाग घेणे टाळले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com