agriculture news in marathi, urad rate below MSP, Maharashtra | Agrowon

उडदालाही मिळेना हमीभाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018


उडदाला प्रतिक्विंटलसाठी ५६०० चा हमीभाव आहे. तर मुगाला ६९७५ रुपये हमीभाव केंद्राने जाहीर केला. यापेक्षा कमी दरात खरेदी कशी सुरू आहे. हा प्रकार बंद व्हावा. शासनाने आपले हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत. 
- सोपान पाटील, नेते, राष्ट्रवादी किसान सभा

जळगाव ः मुगानंतर आता उडदाचे उत्पादन घरात आले आहे, त्यातच हमीभावाच्या मुद्द्यावरून ठप्प असलेले काही बाजार समित्यांचे कामकाज हवे तसे गतिमान झालेले नाही. परंतु जळगाव बाजार समितीत मात्र सोमवारी (ता. १०) मूग व उडदाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव झाले. या वेळी उडदाला केंद्राने प्रतिक्विंटल ५६०० रुपये दर जाहीर केला असताना, खासगी बाजारात ४००० ते ४५०० रुपये दर देण्यात आले. 
 

हमीभावापेक्षा कमी दरात कशी खरेदी करता येईल, असे बाजार समित्यांमधील अडतदार, व्यापारी यांनी म्हटले होते. जोपर्यंत शासन शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीची हमी देत नाही, तोपर्यंत बाजार समितीत खरेदी सुरळीत होणार नाही, असा पवित्राच जणू व्यापाऱ्यांनी घेतला होता. त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कमी दर्जाच्या शेतीमालाची (नॉन एफएक्‍यू) हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करता येईल. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे संमतीपत्र लिहून घ्यावे, असे स्पष्टपणे एका बैठकीत अडतदार, व्यापाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार सोमवारी जळगावात लिलाव पार पडले. ज्या शेतकऱ्यांचा मूग, उडीद हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला, त्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेण्यात आले. उडदाची सुमारे २०० क्विंटल तर मुगाची ३५० क्विंटल आवक झाली होती, अशी माहिती मिळाली. 

मंगळवारीही (ता. ११) लिलाव सुरू झाले. त्यात हमीभाव कुठल्याही शेतीमालास मिळू शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

खानदेशातील नंदुरबार, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, चोपडा, शिरपूर या प्रमुख बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदी सुरू झाली असून, तेथेही संमतीपत्र लिहून घेऊन मूग व उडदाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले. 

व्यापाऱ्यांना हवीलेखी हमी
यावल, चोपडा, चाळीसगाव, शहादा, शिरपूर येथील काही अडतदार, व्यापाऱ्यांनी आपल्याला शासनाने हमीभावापेक्षा कमी दरात शेतीमाल खरेदीसंबंधी लेखी हमी, परिपत्रक द्यावे, अशी भूमिका कायम ठेवली असून, लिलावात सहभाग घेणे टाळले आहे.

 

इतर बातम्या
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...