Agriculture news in marathi Urakle Mill by six factories; 97 lakh 38 thousand tons of sugarcane crushing | Page 2 ||| Agrowon

सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप 

विकास जाधव
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सातारा जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचा गाळप अंतिम टप्प्यात आले आहे.

सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचा गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार क्विंटल विक्रमी साखरेची निर्मिती केली आहे. साखर निर्मितीत जिल्ह्याने कोटीचे उड्डाण केले आहे. सर्वाधिक साखर उतारा सह्याद्री साखर कारखान्याला मिळाला असून, गाळपात जरंडेश्‍वर कारखान्याची आघाडी राहिली आहे. 

कोरोनाच्या महामारीतही साखर हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत सहा साखर कारखान्यांचे गळीत संपले आहे. यामध्ये श्रीराम साखर कारखाना फलटण, बाळासाहेब देसाई कारखाना पाटण, रयत साखर कारखाना कऱ्हाड, ग्रीन पॉवर शुगर गोपूज खटाव, स्वराज्य इंडिया ॲग्रो, खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ, या कारखान्यांचा समावेश आहे. या गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होता; पण अनेक कारखान्यांची तोडणी व वाहतूक यंत्रणा विस्कळित असूनही चांगल्या पद्धतीने गळीत यशस्वी केले आहे. सहकारी तीन व खासगी तीन कारखान्यांचे गळीत पूर्ण झाले आहे.

उर्वरित नऊ कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत या सर्व कारखान्यांनी मिळून ९७ लाख ३८ हजार ७४४ टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार ९४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ११.२३ टक्के मिळाला आहे. यामध्ये खासगी कारखान्यांनी एकूण ५० लाख ९६ हजार १८७ टन उसाचे गाळप करून ५४ लाख १८ हजार ३४५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ४६ लाख ४२ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून ५५ लाख १८ हजार ५९५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 

या वर्षी ऊस गाळपात कोरेगाव तालुक्‍यातील जरंडेश्‍वर शुगरने आघाडी घेत १४ लाख १९ हजार ६६० टन उसाचे गाळप करून १६ लाख २७ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केलेली आहे, तर साखर उताऱ्यात सह्याद्री साखर कारखान्याने आघाडी घेत १२.६५ टक्के उतारा मिळाला आहे. 

कारखानानिहाय ऊस गाळप (टन) आणि कंसात साखरनिर्मिती (क्विंटल) 
श्रीराम कारखाना : ४,५७,१४२ (५,३४,८७०), कृष्णा कारखाना १२,००,६५० (१४,५०,३७०), किसन वीर वाई ४,१६,०६८ (३,८२,८००), बाळासाहेब देसाई कारखाना २,३३,३२६ (२,७८,५७५), सह्याद्री कारखाना ११,९७,००० (१५,१३,९८०), अजिंक्‍यतारा कारखाना ६,५१,१४० (७,७२,९५०), रयत अथणी शुगर ४,६०,१३१ (५,६८,०००), खंडाळा कारखाना २७,१०० (१७,०५०), दत्ता इंडिया साखरवाडी ४,५०,२०२ (५,३६,३२०), जरंडेश्‍वर शुगर कोरेगाव १४,१९,६६० (१६,२७,०००), जयवंत शुगर कऱ्हाड ६,६८,५०५ (७,१८,९५०), ग्रीन पॉवर शुगर गोपुज खटाव ५,१४,०१२ (५,६७,१५०), स्वराज्य इंडिया ॲग्रो उपळवे ६,५२,४८० (५,६४,०७५), शरयू ॲग्रो कापशी, फलटण ८,३१,४२७ (७,८६,१५०), खटाव- माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ ५,५९,९०० (६,१८,७००).
 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...