Agriculture news in marathi From the Urdhva Wardha project Water supply to Tivasa city | Page 2 ||| Agrowon

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी ०.६७८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तशा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे तिवसा शहराचा पेयजलाचा प्रश्न कायमस्वरुपी संपेल. 

अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी ०.६७८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तशा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे तिवसा शहराचा पेयजलाचा प्रश्न कायमस्वरुपी संपेल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. 

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीसाठी ०.६७८ दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजुरी मिळण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तिवसा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ०.६७८ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. तिवसा शहराची सन २०३८ ची अंदाजित लोकसंख्या विचारात घेऊन पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची हक्क मंजूर झाल्याने पेयजलाचा प्रश्न संपुष्टात येण्याबरोबरच दीर्घकाळ पाण्याची उपलब्धता राहणार आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांच्याकडून पिण्याच्या पाणी आरक्षणापोटी सिंचन पुन:र्स्थापना खर्च घेतला जाणार नसल्याचे निर्णयात नमूद आहे. तिवसा नगरपंचायतीने संपूर्ण सेवा क्षेत्रात बंदिस्त नलिका मल:निसारण प्रणाली व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेसोबतच तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल.

राज्य जल परिषदेच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कमीत कमी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करून ताज्या पाण्याची गरज कमी करण्याचेही शासनाचे निर्देश आहेत. कोणत्याही वर्षासाठी पाण्याचा वास्तविक कोटा त्या वर्षाच्या १५ ऑक्टोबर रोजी स्त्रोत जलाशयाच्या पाण्याची साठवण स्थिती व निश्चित केलेल्या तूट वाटण्याची सूचनेनुसार नदी खोरे अभिकरणाद्वारे निश्चित केला जातो.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...