Agriculture News in Marathi Urea balance in Khandesh It will also be available in Rabbi | Agrowon

खानदेशात युरिया शिल्लक  रब्बीतही उपलब्ध होणार 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

खानदेशात युरियाची खरिपात मोठी टंचाई जाणवली. परंतु रब्बी हंगामात युरियाचा वापर कमी झाला असून, पुरवठा सुरळीत किंवा हवा तेवढा झाला. यामुळे युरिया शिल्लक असून, हा साठा आगामी खरीप हंगामातही उपलब्ध होणार आहे. 

जळगाव : खानदेशात युरियाची खरिपात मोठी टंचाई जाणवली. परंतु रब्बी हंगामात युरियाचा वापर कमी झाला असून, पुरवठा सुरळीत किंवा हवा तेवढा झाला. यामुळे युरिया शिल्लक असून, हा साठा आगामी खरीप हंगामातही उपलब्ध होणार आहे. 

विविध खत कंपन्यांतर्फे युरियाचा पुरवठा खानदेशात झाला. खरिपात जळगाव जिल्ह्यात १ लाख ३० हजार टन युरियाचा पुरवठा अपेक्षित होता. यापाठोपाठ फॉस्फेट व इतर सरळ खतांचा पुरवठा अपेक्षित होता. यात युरियासह पोटॅशचा पुरवठा विस्कळीत होता. तसेच १०.२६.२६ खताची देखील टंचाई तयार झाली होती. लॉकडाउन मध्येही पुरवठा करण्याचा प्रयत्न कंपन्यांनी केला. परंतु पुरवठा विस्कळीत स्वरुपातच होता. युरियाचा फक्त ७० टक्के पुरवठा खरिपात झाला. अतिपावसात खतवापर कमी झाला. खरिपातील युरियाचा पुरवठा कंपन्यांनी केला. रब्बीसाठी सुमारे ७० हजार टन युरिया पुरवठा लक्ष्यांक मंजूर होईल, असे दिसत आहे. 

खानदेशात १ लाख १० हजार टन युरियाचा पुरवठा रब्बीमध्ये अपक्षित आहे. खरिपातील युरियाचा सुमारे २१ हजार टन युरियाचा साठा शिल्लक राहीला आहे. सध्या केळी पट्टा वगळता इतर भागात खतांची मागणी नाही. यामुळे खतसाठा कायम राहणार असून, रब्बीत हा साठा उपयोगात येईल. हा साठा गोदामांमध्ये आहे. कंपन्यांना त्यासाठी आपला निधी खर्च करावा लागत आहे. तसेच काही खरेदीदार आपल्याकडे युरियाचा साठा करून घेत आहेत. युरियासोबत पोटॅस, फॉस्फेट, १०.२६.२६ या खतांचा साठाही पुरेसा आहे. १०.२६.२६ या खताचा सुमारे दोन हजार टन साठा आहे. शिवाय त्याचा पुरवठा पुढेही सुरळीत होणार आहे, अशी माहिती मिळाली.  


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...