युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर एकरांवर प्रात्यक्षिके

शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट्सच्या वापरातून खताची बचत आणि उत्पादनात होणारी वाढ दाखवून देणे हा या प्रात्यक्षिके राबविण्यामागचा मुख्य उद्देश होता. जो चांगल्या प्रकारे सफल झाला आहे. - पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा रासायनिक खतांचा अज्ञानातून होणारा बेसुमार वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करण्याबाबत तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, प्रसिद्धीचे काम करण्यात येत आहे. ही प्रात्यक्षिके देखील त्याचाच एक भाग होती. - डॉ. रामचंद्र धायगुडे, तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा आत्माच्या प्रात्यक्षिकांमधले सहभागी होऊन माझ्या एक एकर नाचणीसाठी युरिया ब्रिकेट्सचा वापर केला. पिकाची जोमदार वाढ झाली आहे. कणसंही नेहमीपेक्षा मोठ्या आकाराची निपजली आहेत. उत्पादनवाढीची खात्री वाटत आहे." - नाना पाटील, किसरुळ, शेतकरी
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर एकरांवर प्रात्यक्षिके
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर एकरांवर प्रात्यक्षिके

कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यात भात आणि नाचणीचे उत्पादन वाढण्याच्या उद्देशाने या पिकांमधे युरिया ब्रिकेट्सच्या वापराची शंभर एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात आली आहेत. 

तालुक्यातील हरपवडे, गोठे, बाजारभोगाव, काऊरवाडी, किसरुळ, पाटपन्हाळा, पोहाळे तर्फ बोरगाव, पोहाळवाडी, मोताईवाडी, काळजवडे, वाळोली, वेतवडे या गावांमधील एकशे बारा शेतकऱ्यांच्या शेतावर खरिपात भात आणि नाचणी पिकासाठी प्रती एकर सत्तर किलो युरिया ब्रिकेट्स या खताचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ब्रिकेट्सच्या वापराबाबत प्रशिक्षणेही देण्यात आली. 

प्रात्यक्षिके राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे कडुन आत्माने अनुदानावर युरिया ब्रिकेट्सचा पुरवठा केला होता. युरिया आणि डाय अमोनिअम फॉस्पेटच्या चॉकलेटच्या आकाराच्या गोळ्या पिकाच्या चुडात खोचल्याने खताचा -हास होत नाही आणि पिकाच्या गरजेनुसार खत उपलब्ध झाल्याने वाढीस चालना मिळते. या प्रात्यक्षिकांमुळे भागातील भात आणि नाचणीचे उत्पादन वाढण्यास मदत मिळणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com