Agriculture news in marathi, Urea briquet demonstrates on 100 acres in Panhala taluka | Page 2 ||| Agrowon

युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर एकरांवर प्रात्यक्षिके

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट्सच्या वापरातून खताची बचत आणि उत्पादनात होणारी वाढ दाखवून देणे हा या प्रात्यक्षिके राबविण्यामागचा मुख्य उद्देश होता. जो चांगल्या प्रकारे सफल झाला आहे.
- पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा 

रासायनिक खतांचा अज्ञानातून होणारा बेसुमार वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करण्याबाबत तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, प्रसिद्धीचे काम करण्यात येत आहे. ही प्रात्यक्षिके देखील त्याचाच एक भाग होती.
- डॉ. रामचंद्र धायगुडे, तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा 

आत्माच्या प्रात्यक्षिकांमधले सहभागी होऊन माझ्या एक एकर नाचणीसाठी युरिया ब्रिकेट्सचा वापर केला. पिकाची जोमदार वाढ झाली आहे. कणसंही नेहमीपेक्षा मोठ्या आकाराची निपजली आहेत. उत्पादनवाढीची खात्री वाटत आहे."
- नाना पाटील, किसरुळ, शेतकरी 

कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यात भात आणि नाचणीचे उत्पादन वाढण्याच्या उद्देशाने या पिकांमधे युरिया ब्रिकेट्सच्या वापराची शंभर एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात आली आहेत. 

तालुक्यातील हरपवडे, गोठे, बाजारभोगाव, काऊरवाडी, किसरुळ, पाटपन्हाळा, पोहाळे तर्फ बोरगाव, पोहाळवाडी, मोताईवाडी, काळजवडे, वाळोली, वेतवडे या गावांमधील एकशे बारा शेतकऱ्यांच्या शेतावर खरिपात भात आणि नाचणी पिकासाठी प्रती एकर सत्तर किलो युरिया ब्रिकेट्स या खताचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ब्रिकेट्सच्या वापराबाबत प्रशिक्षणेही देण्यात आली. 

प्रात्यक्षिके राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे कडुन आत्माने अनुदानावर युरिया ब्रिकेट्सचा पुरवठा केला होता. युरिया आणि डाय अमोनिअम फॉस्पेटच्या चॉकलेटच्या आकाराच्या गोळ्या पिकाच्या चुडात खोचल्याने खताचा -हास होत नाही आणि पिकाच्या गरजेनुसार खत उपलब्ध झाल्याने वाढीस चालना मिळते. या प्रात्यक्षिकांमुळे भागातील भात आणि नाचणीचे उत्पादन वाढण्यास मदत मिळणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलननगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर...
नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गारनांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता...
सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा...सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध...
काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठाअकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक...
महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलनअकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये...
दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘...कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर...
दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ...पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी...
गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडेपुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी...
राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान...नाशिक  : कांदा हे पीक दरवर्षी कोणत्या ना...
सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार...
दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन...अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने...
शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकेल...नगर  ः महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व...
... तर आम्ही मोठे आंदोलन करू ः...पुणे  ः राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर...
राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या...कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व...
डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीकनांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी...
नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...