खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळ

जळगाव : खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच युरियाची टंचाई तयार झाली. या संदर्भात तक्रारी वाढल्याने प्रशासनही जागे झाले आहे. प्रशासनाने धावपळ करीत खतपुरवठादार कंपन्या, संस्थांशी चर्चा सुरू केली आहे.
Urea issue administration rush in Khandesh
Urea issue administration rush in Khandesh

जळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच युरियाची टंचाई तयार झाली. या संदर्भात तक्रारी वाढल्याने प्रशासनही जागे झाले आहे. प्रशासनाने धावपळ करीत खतपुरवठादार कंपन्या, संस्थांशी चर्चा सुरू केली आहे. 

संयुक्त खते आणि फॉस्फेट, पोटॅशचा पुरवठा सुरळीत आहे. ११ हजार टन खतांचा संरक्षित साठा (बफर) करण्यात आला आहे. परंतु या संरक्षित साठ्यात युरियाचा साठा फारसा नाही. संयुक्त खते त्यात अधिक आहेत. यातच नव्या हंगामात सुमारे एक लाख ३० हजार टन युरियाचा पुरवठा होणार आहे. पण हा पुरवठा करताना काही कंपन्या लिकिंग करीत असल्याच्या तक्रारी वितरक, विक्रेत्यांमध्ये वाढल्या. जेवढा युरिया हवा आहे, त्या तुलनेत किमान २० ते २५ टक्के आपली संयुक्त किंवा न खपणारी खते घ्यावी लागतील, अशा अटी कंपन्या पुरवठादारांसमोर टाकत आहेत. यामुळे खतपुरवठ्याचे गणितही बिघडले. 

जूनच्या सुरवातीला पावसाळी वातावरण होते. त्या वेळेस युरियाची मागणी होती. युरियाची टंचाई अनेकांना जाणवत होती. अशातच शेतकऱ्यांना जादा दरात संयुक्त खताच्या एक किंवा दोन गोण्या घेण्याची सक्ती केली जात होती. ग्रामीण भागात काळाबाजार, जादा दर आकारण्याचे प्रकार सुरू झाले. यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारी वाढताच वितरकांनी आम्हाला कंपन्याच युरियासोबत इतर खते लिकिंग करून देत आहेत. लिकींगच्या खतांना नकार दिल्यास पुरवठा सुरळीत केला जात नाही, अशी बतावणी विक्रेत्यांनी केली. यानंतर प्रशासनाने कंपन्या व वितरकांसोबत चर्चा केली. 

युरियाचा पुरवठा सुरळीत व लिकिंगशिवाय करावा. कंपन्यांनी सक्ती करू नये आणि वितरकांनीदेखील कुठलीही बतावणी न करताना आपल्याकडे उपलब्ध युरियाची विक्री शेतकऱ्यांना निश्चित दरात करावी, अशा सूचना केल्या. गेल्या आठवड्यात युरियाचा सुमारे चार हजार टन नव्याने पुरवठा जिल्ह्यात झाला. 

मुबलक खतसाठ्यासाठी प्रयत्न

संयुक्त खतांचा पुरवठा जूनमधील पुरवठा लक्ष्यांकाच्या तुलनेत ४० टक्के आहे. पाऊस नसल्याने खतांची मागणी कमी आहे. परंतु प्रशासन युरिया, फॉस्फेट व १०.२६.२६ या खताचा मुबलक साठा कसा राहील, यासाठी सध्या काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com