agriculture news in Marathi, Urea linking in Jalgaon District, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात युरियावर लिंकिंग, तुटवड्याने शेतकऱ्यांची पिळवणूक

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

युरियाची टंचाई मध्यंतरी होती. सध्या पुढे रब्बी हंगाम चांगला राहील या अपेक्षेने विक्रेते युरियाचा साठा करून घेत आहेत. यामुळे टंचाई वाटत आहे. लिंकिंगची माहिती आमच्यापर्यंत आली. परंतु ही लिंकिंग कुठले विद्राव्य खत किंवा इतर बाबींची नव्हती. युरियासोबत इतर रासायनिक खत घेण्याच्या अटी काही कंपन्यांनी घातल्या. या संदर्भात कुठलीही लेखी तक्रार आमच्याकडे मात्र कुणी केली नाही. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

जळगाव ः जिल्ह्यात युरियासोबत १०.२६.२६ या खताची दोन कंपन्यांकडून सर्रास लिंकिंग सुरू आहे. यामुळे खत विक्रेते, शेतकरी यांची वित्तीय पिळवणूक होत असून, या दोन्ही कंपन्यांवर कारवाईसंबंधी मागणी केली जात आहे. 

या दोन्ही कंपन्यांची नावे खत विक्रेते जाहीरपणे सांगण्यास नकार देत आहेत. कारण कंपन्यांची नावे जाहीर केली तर युरिया मिळणे कठीण होईल. युरियाचा अधिकाधिक पुरवठा या दोन कंपन्यांकडून केला जातो. मागील काही दिवसांमध्ये या दोन्ही कंपन्यांनी सुमारे साडेसात हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळून केला आहे. ज्या खत वितरकांनी आपल्याकडून १०.२६.२६ घेतले, त्यांनाच या युरियाची विक्री केली आहे.

यातच या दोन्ही कंपन्यांच्या १०.२६.२६ खताचे दर इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक आहेत. इतर कंपन्यांची १०.२६.२६ ची एक ५० किलोची गोणी १२०० रुपयाला मिळते. परंतु या दोन्ही कंपन्या एका गोणीमागे ६५ रुपये जादा दर आकारतात. ३०० गोण्या युरिया हवा असेल तर १०० गोण्या १०.२६.२६ घ्या, असा लिंकिंगचा व्यवहार या कंपन्या सर्रास करीत आहेत, अशी तक्रार एका विक्रेत्याने ॲग्रोवनकडे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

एका कंपनीने पोटॅश व 
१५.१५.१५ची केली सक्ती

कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी १५ दिवस युरियाचा पुरवठाच बंद होता. एका कंपनीने या दरम्यान आपल्याकडील युरिया वितरकांना देताना १५.१५.१५ व पोटॅश खत घेण्याची सक्ती केल्याची माहिती मिळाली. युरियाचा किरकोळ तुटवडा मध्यंतरी होता, परंतु कुणाकडूनही या संदर्भात ठोस किंवा लेखी तक्रार केली नाही. मागील पाच-सात दिवसांत जिल्ह्यात नर्मदा व कृभको या कंपन्यांनी मिळून सुमारे साडेतीन हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली. 

किरकोळ बाजारात शेतकऱ्यांची लूट
ग्रामीण भागात किंवा मोठ्या गावातील बाजारात युरिया खतावर महिनाभरापासून लिंकिंग सुरू आहे. सहा गोण्या युरियावर दोन गोण्या १०.२६.२६ घेण्याची सक्ती अनेक भागांत विक्रेते शेतकऱ्यांना करीत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांची ही लूट होत असली तरी कृषी विभागाने अद्याप या संदर्भात एकही कारवाई केलेली नाही. कंपनीलाही जाब विचारलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 


इतर अॅग्रो विशेष
पाहिजे तो भाजीपाला थेट दारात;...नाशिक : कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात...
कोणत्याही संकटाचा पहिला घाव शेतीवरच का...मा. श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र...
पंतप्रधानांना शेतकऱ्याचे पत्र : वर्तमान...मा. नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान, भारत सरकार...
हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे :...मुंबई  : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे....
राज्यभरात २२ हजारावर खोल्यांची सज्जता...मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची...
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात...सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
कोरोनाचा धसका; त्यात पावसाचा तडाखा;...पुणे: राज्याच्या विविध भागात गारपीट, वादळी...
३१ मार्च नजीक : शासकीय योजनांना...अकोला  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
आम्ही 'कोरोना मुक्त' झालो, इतर रुग्णही...पुणे: ‘‘आम्ही कोरोनापासून मुक्त झालो आहोत. इतर...
विदर्भातील धान खरेदीला ३१ मे पर्यंत...नाशिक : विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१...
संपूर्ण देश पुढील २१ दिवस ‘लॉकडाउन’नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला भारतातून हद्दपार...
खते, बियाण्यांची दुकाने उघडी ठेवा :...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे...
बाजार समित्या सुरूच ठेवा;...पुणे ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी,...
राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही :...मुंबई : राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही....
राज्यात आज गारपिटीचा इशारापुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
कोरोनामुळे राज्यात चौथा मृत्यूमुंबई : मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा...
गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीच्या...पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
राज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाजपुणे: राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान...
केळी, कापसाची खेडा खरेदी बंदजळगाव ः खानदेशात कापूस फारसा शेतकऱ्यांकडे...
राज्यात संचारबंदी लागू मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...