agriculture news in Marathi urea scarcity in Jalgaon and Dhule Maharashtra | Agrowon

जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

पेरणी पूर्ण होत आली आहे. युरियासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, तो आम्हाला लिंकिंगमध्ये घ्यावा लागत आहे. त्याशिवाय मिळतच नाही. जिल्हा प्रशासनाने लिंकिंगचा प्रश्‍न सोडवून आम्हाला पुरेसा युरिया उपलब्ध करून द्यावा. 
- दिनेश पाटील, शेतकरी, पाचोरा, जि. जळगाव

धुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६ खतांची टंचाई आठवडाभरापासून कायम आहे. शेतकऱ्यांना खतांसाठी वणवण फिरावे लागत असून, युरियावर लिंकिंग होत आहे. काही कंपन्यांकडून खतपुरवठा फारसा झालेला नाही. 

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासणार नाही असे सांगत पुरेसासाठा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. पाऊस बऱ्यापैकी झाल्याने जवळपास ८८ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. पिकांना खते देण्यासाठी शेतकरी कार्यवाही करीत आहेत.

परंतु, युरिया पुरेसा नाही. १०.२६.२६ ची टंचाई आहे. डीएपी व पोटॅशचा पर्याय विक्रेते शेतकऱ्यांना देतात. युरियाच्या फक्त पाच ते आठ गोण्या एका शेतकऱ्याला देत आहेत. त्यातही पाच युरिया गोण्यांवर एक डीएपी किंवा इतर कुठल्या खताची गोणी घेण्याचे बंधन करीत आहेत. 

एका शेतकऱ्याला एका विक्रेत्याकडे पाच १०.२६.२६ मिळणेही जळगावात दुरापास्त झाले आहे. जिल्ह्यात खतांचा काळाबाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांकडून जिल्हाभर तपासणी सुरू आहे.

परंतु, कारवाई कुठेही झालेली नाही. जळगाव व धुळ्यात जूनमध्ये युरियाचा निर्देशीत लक्ष्यांकानुसार ४० टक्केही पुरवठा झालेला नाही. जळगाव जिल्ह्यात हंगामाच्या अखेरपर्यंत सुमारे एक लाख १० हजार मेट्रिक टन  युरियाचा पुरवठा अपेक्षित आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...