Agriculture news in Marathi Urea shortage in Deola taluka | Agrowon

देवळा तालुक्यात युरिया टंचाई

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

नाशिक : देवळा तालुक्यात मका, बाजरी, भुईमूग या सर्व पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता आहे, मात्र तालुक्याच्या विविध भागांत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे; तर काही ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

नाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला पेरणीसाठी चांगला पाऊस झाल्याने मका, बाजरी, भुईमूग व इतर पिकांची पेरणी केली. त्यामुळे सध्या शेतकरी पिकांच्या मशागतीत व्यग्र आहेत. या सर्व पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता असते. तालुक्याच्या विविध भागांत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे; तर काही ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

दोन आठवड्यांपासून विठेवाडी, सावकी, खामखेडे, वाजगाव, खर्डे, मेशी, डोंगरगाव, महालपाटणे, वासोळ, खालप, लोहोणेर गावात रासायनिक खतांच्या दुकानांमध्ये युरिया मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या वाट्याला आलेला युरिया गेला कुठे, असा सवाल बळिराजाला पडला आहे. वितरकाकडे माल आल्यास तो काही वेळातच संपतो. त्यामुळे विक्रेत्यांकडून तो गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही, असा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. 

खेड्यांतील लहान शेतकरी दोन तीन गोण्या खरेदी करण्यासाठी तालुक्यात युरिया घेण्यासाठी भाड्याचे वाहन करून जाऊ शकत नाही. तालुक्यातील वितरकांकडून खेड्यांतील विक्रेत्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मागणी असूनही पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबतीत तहसील व कृषी विभागानेही लक्ष घालण्याची गरज आहे. युरिया उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून कळते. मग शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

युरिया कुठेही उपलब्ध नाही. तालुक्याला १३५ टन युरिया प्राप्त झाला. मात्र तो मागणीच्या तुलनेत कमीच आहे. देवळा तालुक्याचा कोटा वाढवावा. तो अत्यल्प आहे; तरच ग्रामीण भागात तो पुरवठा करणे शक्य होईल.
- जगदीश पवार, आरसीएफ वितरक, देवळा.

सध्या रॅक उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. भाग बागायती असल्याने काही शेतकऱ्यांना मिळतो; तर काहींना तो उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. एक महिन्यापासून माझ्याकडे माल उपलब्ध नाही.
- अभिजित निकम, खत विक्रेते, विठेवाडी, ता. देवळा

युरियाचा पुरवठा सध्या कमीच आहे. सध्या उचल अधिक झाल्याने माल संपलेला आहे. सध्या फक्त उमराणे येथे विक्री सुरू आहे.
- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...