खानदेशात युरियाची टंचाई

युरियाची टंचाई तयार झाली आहे. ही कृत्रीम टंचाई असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, युरियाच्या सहा गोण्यांसोबत एक मिश्र खताची गोणी घेण्याचे बंधन काही केंद्रचालक करीत आहेत.
Urea shortage in Khandesh
Urea shortage in Khandesh

जळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील झालेली नाही. त्यातच युरियाची टंचाई तयार झाली आहे. ही कृत्रीम टंचाई असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, युरियाच्या सहा गोण्यांसोबत एक मिश्र खताची गोणी घेण्याचे बंधन काही केंद्रचालक करीत आहेत. 

तसेच काही कंपन्या आपल्या युरियासोबत न खपणारी खते कृषी केंद्र, वितरकांच्या माथी मारत आहेत. यामुळे ही लिंकिंग सुरू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. जळगाव जिल्हा रासायनिक खतांच्या वापरात आघाडीवर आहे. केळी, भाजीपाला पिकांसाठी बारमाही खते, विद्राव्य खतांची मागणी असते. केळीसाठी युरिया, पोटॅश व मिश्र खतांची खरेदी शेतकरी करून ठेवतात. 

एकाच वेळी सर्व खते खरेदीवर शेतकऱ्यांचा भर असतो. तर पहिला पाऊस आल्यानंतर अनेक शेतकरी ज्वारी, बाजरी, मका पेरणी करतानाच रासायनिक खतांची पहिली मात्रा देतात. परंतु पाऊस आलेला नसतानाच युरियाची टंचाई तयार झाली आहे. युरियाचा पुरेसा साठा असल्याची बतावणी कृषी विभाग सतत करीत आहे. परंतु युरियाची टंचाई तयार झाली आहे. 

युरियाचा सुमारे एक लाख ३० हजार टन एवढा पुरवठा खरिपात अखेरपर्यंत होणार आहे. परंतु हा पुरवठा रखडत सुरू आहे. पुरवठा कंपन्या रेल्वेच्या माध्यमातून करतात. मुंबई, गुजरातमधून खतांचा पुरवठा होतो. परंतु हा पुरवठा निर्देशित लक्ष्यांकाच्या तुलनेत मे महिन्यात ५० टक्केच झाला आहे. दर महिन्याला युरिया पुरवठ्याचा वेगळा लक्ष्यांक आहे. मे महिन्यातच एकूण लक्ष्यांकातील २५ टक्के पुरवठा अपेक्षित होता. परंतु अत्यल्प पुरवठा झाला आहे.

‘कृषी’चा ११ हजार टन साठ्याचा दावा कृषी विभाग ११ हजार टन खतांचा संरक्षित साठा केल्याचे सांगत आहे. परंतु त्याचा वापर केव्हा सुरू होईल, त्यात युरिया किती हा मुद्दा आहे. ग्रामीण भागात युरियाची अधिकची टंचाई आहे. शहरातही काही केंद्रांतच ओळखीपाळखीच्या शेतकऱ्यांना किंवा मर्जीतील मंडळींना पुरेसा युरिया उपलब्ध होत आहे. लिंकिंगमुळे अधिकचा निधी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com