परभणी जिल्ह्यात गरजेवेळी युरियाचा तुटवडा

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया खताचा मागणीपेक्षा कमी पुरवठा करण्यात आला. त्यात यंदा रविवार(ता. ५)पर्यंत उपलब्ध २२ हजार ६०० टन युरिया खताची विक्री झाली. ऐन गरजेवेळी युरिया खताचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
urea shortage in Parbhani district
urea shortage in Parbhani district

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया खताचा मागणीपेक्षा कमी पुरवठा करण्यात आला. त्यात यंदा रविवार(ता. ५)पर्यंत उपलब्ध २२ हजार ६०० टन युरिया खताची विक्री झाली. ऐन गरजेवेळी युरिया खताचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रांगा लावून युरिया खत विकत घेण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कृषी विभागाने कृत्रिम टंचाई, साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक करावाई करावी. तत्काळ युरिया खत उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यंदा खरिपात कृषी विभागाने ६० हजार ५०० टन युरियासह विविध ग्रेडच्या १ लाख ५१ हजार २०० टन खतांची मागणी केली होती. परंतु, युरियाचा ३१ हजार २०० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. मार्चअखेर ६ हजार ९९४ टन युरियासह विविध ग्रेडचा एकूण २४ हजार ७७१ टन खतसाठा उपलब्ध होता. एक एप्रिल ते शुक्रवार(ता. ३)पर्यंत एकूण १३ हजार ६०६ टन युरियासह विविध ग्रेडचा ५४ हजार १३१ टन खतसाठ्याचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण २० हजार ६०० टन युरियासह अन्य ग्रेडचा मिळून ७८ हजार ९०२ टन खतसाठा उपलब्ध झाला होता. 

शुक्रवार(ता. ३)पर्यंत २० हजार ४०० टन युरियाची विक्री झाली. रविवारी (ता. ५) २ हजार ५०० टन युरिया उपलब्ध झाला होता. सोमवारी (ता. ६) सेलू, जिंतूर, अन्य तालुक्यातील कृषी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्तात प्रति शेतकरी १ किंवा २ बॅग देण्यात आल्या. त्यामुळे जेमतेम २०० ते ३०० टन युरिया खत शिल्लक राहिले असावे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच खत विक्रेते जादा दराने तसेच अटी शर्थी, लिंकिंग करून युरिया खताची विक्री करत होते. शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात युरियाच्या बॅग मिळत नव्हत्या. जिल्ह्यातील ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अनेक भागातील वाढीच्या अवस्थेतील कपाशी आदी पिकांना देण्यासाठी युरिया खतांची मागणी शेतकऱ्यांकडून वाढली आहे. अपुऱ्या खतांमुळे शेतकऱ्यांना रांगा लावून खत विकत घेण्याची वेळ आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com