Agriculture news in Marathi Urea shortage persists in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायम

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून युरियाची टंचाई निर्माण केली जात आहे. युरिया खताच्या गोणीची जादा दराने खरेदी केली जात आहे. तसेच युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह देखील केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

नगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून युरियाची टंचाई निर्माण केली जात आहे. युरिया खताच्या गोणीची जादा दराने खरेदी केली जात आहे. तसेच युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह देखील केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कृषी विभाग मात्र अलबेल असून विक्रेत्यांना पाठीशी घालत खताची टंचाई नसल्याचा नेहमीप्रमाणे दावा करतेय. युरिया जादा दराने खरेदी करावा लागत असल्याने शेतकरी मात्र हतबल झालेत.

नगर जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत पाच लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. बाजरीचे क्षेत्र सरासरीच्या जवळ, तर मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सरासरीच्या क्षेत्रापुढे गेली आहे. सध्या पिके जोमात असून पाऊसही चांगला असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र सध्या पिकांना युरियाची गरज असताना तो मात्र मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उपलब्ध असूनही युरिया दिला जात नाही.

काही ठिकाणी जादा किंमत मोजावी लागतेय तर काही ठिकाणी युरियासोबत अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जातेय. खते, बियाणांचा काळाबाजार होऊ नये म्हणून चौदा तालुक्यांत भरारी पथके नियुक्त केल्याचे कृषी विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात कुठेही कारवाई केलेली दिसत नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी असतानाही दखल घेतली जात नसेल तर पथके नेमकी करतात काय असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इथं कोण स्टिंग आॅपरेशन करणार
युरिया असूनही कृषी निविष्ठा विक्रेते तो देत नाहीत. त्यासोबत अन्य खते घ्यायला लावतात. त्याबाबत मी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे मला युरिया खत मिळाले. मात्र गरजेच्या वेळीच शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याची स्थिती आहे.
- ज्ञानेश्वर गागरे, शेतकरी, वनकुटे, जि. नगर


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...