पुणे जिल्ह्यात युरिया टंचाई

पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे; तर काही ठिकाणी पेरणी सुरू आहे. यासाठी लागणारा युरिया अनेक ठिकाणी मिळेनासा झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार युरियाची जादा दराने विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
Urea shortage in Pune district
Urea shortage in Pune district

पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे; तर काही ठिकाणी पेरणी सुरू आहे. यासाठी लागणारा युरिया अनेक ठिकाणी मिळेनासा झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार युरियाची जादा दराने विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने युरिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाचे सुमारे दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे दोन लाखांहून अधिक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीच्यावेळी प्रामुख्याने युरिया खताची मोठ्या प्रमाणात गरज असते. यंदा कृषी विभागाने युरिया अवघा ३५ हजार ६३५ टन खते मंजूर केली होती. गेल्या वर्षीचे १८ हजार ५५० हजार टन खते उपलब्ध होती. खरिपात मंजूर खतापैकी कंपन्यांनी ३० हजार ९६२ टन खते उपलब्ध करून दिली आहेत.

जिल्ह्यात एकूण ४९ हजार ५१२ टन युरिया उपलब्ध झाला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची युरिया खताला अधिक मागणी असल्याचे समोर आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २२ जूनअखेर घेतलेल्या अहवालावरून जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशिनद्वारे ४२ हजार ५८६ टन खतांची विक्री केली आहे; तर सहा हजार ९२६ टन खते दुकांनामध्ये शिल्लक असल्याची स्थिती आहे; परंतु अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशिन बंद असल्याची स्थिती आहे.

युरियाची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला आहे. त्यासंदर्भात युरियाचा अधिक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. युरियाला मागणी जास्त असल्याने टंचाई भासत आहे. - रवी कावळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी

सध्या अनेक शेतकऱ्यांनी खरीप बियाण्याची पेरणी केली आहे. चांगल्या पावसामुळे पिके उगवून आली असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यासाठी युरियासह अन्य खतांची आवश्यकता आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी युरिया मिळत नसून टंचाई असल्याचे दुकानदार सांगत आहेत. - भाऊसाहेब पळसकर , शेतकरी, कर्डे, ता. शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com