उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या पुढे

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, उडीद, मुग, तूर, गहू, हरभऱ्याच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर ६ हजाराच्या आत, तर सोयाबीनचे सरासरी दर ८ हजाराच्या पुढेच राहिले.
urid rate 6,000; Soybeans beyond 8,000
urid rate 6,000; Soybeans beyond 8,000

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, उडीद, मुग, तूर, गहू, हरभऱ्याच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर ६ हजाराच्या आत, तर सोयाबीनचे सरासरी दर ८ हजाराच्या पुढेच राहिले.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. १४ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची चार वेळा मिळून ५३५६ क्‍विंटल आवक झाली. ७७३ ते १९९७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या सोयाबीनला सरासरी ८२०० ते ८९१० रुपये प्रतिक्‍विंटल  दर मिळाला. 

बाजार समितीमध्ये उडदाची १०६६२ क्‍विंटल आवक झाली. २०६४ ते २६१२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ६४५० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. मुगाची एकूण आवक ५८१५ क्‍विंटल झाली. ५५१ ते १४५७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मुगाचे सरासरी दर ६४०० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. गव्हाची आवक कमी अधिक झाली तरी दर मात्र जवळपास स्थिर राहिले.

आठवडाभरात चार वेळा मिळून १०६४७ क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला सरासरी १८०० ते १९०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची आवक ७४१६ क्‍विंटल झाली. या हरभऱ्याला सरासरी ५००० ते ५०७० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com