agriculture news in marathi Urud Rate may increase says analyst | Page 2 ||| Agrowon

उडीद दरात सुधारणेची चिन्हे

वृत्तसेवा
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

देशांतर्गत काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत असून त्यास ४८०० ते ६८०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी झाले होते. केंद्र सरकारने कडधान्य आयातीला परवानगी दिल्यानंतर म्यानमारमधून आयात होईल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, म्यानमारमध्ये उडदाचा साठा कमी असल्याने आणि नविन आवक जानेवारीत येणार असल्याने सध्या आयात शक्य होणार नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे देशांतर्गत काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत असून त्यास ४८०० ते ६८०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने यंदा उडदासाठी ६३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदा उडदाची लागवड गेल्यावर्षीएवढीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु मॉन्सूनने चांगली सुरवात केल्यानंतरही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पावसाने अधिक काळ मारलेली दडी आणि गुजरातसह राजस्थानमध्ये अनेक भागांत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा देशात किती उडीद उत्पादन होईल, याबाबत स्पष्टता येत नाही. तसेच उडदाच्या उत्पादकतेवरही परिणाम झाल्याचे वृत्त अनेक ठिकाणांहून आले होते. त्यामुळे देशात उत्पादन वाढीची आशा केव्हाच मावळली आहे. परिणामी दर जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता जाणकारांनी फेटाळून लावली आहे.

गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात उडदाची आवक कमी असल्याने दरात सुधारणा पहायला मिळाली. दरात १५० ते २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत आहे. महाराष्ट्रातील लातूर, अकोला, जळगावसह अनेक ठिकाणी आवक नोंदली गेली. तर कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा तर राजस्थानातील जयपूर आणि केकणी बाजार समित्यांत गेल्या आठवड्यात उडदाचे व्यवहार झाले.

अशी आहे दराची स्थिती
गेल्या आठवड्यात उदाची आवक बाजार समित्यांमध्ये कमीच होती. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. लातूर बाजार समितीत ५६०० ते ७६०० रुपये दर मिळाले. तर अकोल्यात ५२०० ते ७३०० रुपये आणि दुधनी बाजार समितीत ५१०० ते ७००० रुपये आणि जळगावात ४९५० ते ७२०० रुपये दर उडदाला मिळाला. कर्नाटकातही १५० ते २५० रुपयांपर्यंत दर सुधारले. बिदर बाजार समितीत ५९०० ते ७००० रुपये आणि गुलबर्गा बाजार समितीत ५३०० ते ७१५० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर राजस्थानात ६१०० ते ७३२० रुपयांपर्यंत उडदाला दर मिळाले.


इतर अॅग्रोमनी
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...