agriculture news in marathi US begins clinical trial of investigational vaccine for coronavirus | Agrowon

अमेरिकेत चौघांवर लसीची चाचणी; संशोधनातील पहिला टप्पा वेगात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

वॉशिंग्ट ः अमेरिकेत कोरोना व्हायरसवरील (कोविड -१९) लसीसाठी चाचणी सुरू झाली असून, चार निरोगी व्यक्तींच्या हातावर याची पहिली लस सोमवारी (ता. १६) टोचण्यात आली.

‘कैसर पर्मनेंटी वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (केपीडब्ल्यूएचआरआय) या संस्थेतील सिएटल येथील केंद्रात औषधावर संशोधन सुरू आहे. यापूर्वी कोरोना विषाणूवरील लसीसाठी मानवावर चाचणी घेण्यात आलेली नाही. संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी प्रथमच चौघांना ही लस देण्यात आली. चाचणीसाठी संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे. ३ मार्चपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे.

वॉशिंग्ट ः अमेरिकेत कोरोना व्हायरसवरील (कोविड -१९) लसीसाठी चाचणी सुरू झाली असून, चार निरोगी व्यक्तींच्या हातावर याची पहिली लस सोमवारी (ता. १६) टोचण्यात आली.

‘कैसर पर्मनेंटी वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (केपीडब्ल्यूएचआरआय) या संस्थेतील सिएटल येथील केंद्रात औषधावर संशोधन सुरू आहे. यापूर्वी कोरोना विषाणूवरील लसीसाठी मानवावर चाचणी घेण्यात आलेली नाही. संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी प्रथमच चौघांना ही लस देण्यात आली. चाचणीसाठी संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे. ३ मार्चपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उगम प्रथम झाला असला, तरी आता त्याचा प्रसार जगभरात झाला असल्याने अत्यंत कमी वेळेत याची लस तयार करण्याचे आव्हान संशोधकांसमोर असून ‘केपीडब्ल्यूएचआरआय’मधील चाचणीच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ‘अशा आणीबाणीच्या काळात काय करता येईल ते करण्याची संस्थेतील प्रत्येकाची इच्छा आहे,’ असे कैसर पर्मनेंटी अभ्यास गटाच्या प्रमुख डॉ. लिसा जॅकसन यांनी सांगितले.

या संशोधन मोहिमेत कोरोनावरील लस टोचून घेणारी पहिली सहभागी महिला जेनिफर हॉलर (वय ४३) ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एका लहान कंपनीत कार्य व्यवस्थापक या पदावर काम करते. ‘कोरोना व्हायरसमुळे हतबल झाल्याचे आम्हाला वाटत होतो. पण, यासंबंधी काही करण्याची संधी मला या चाचणीद्वारे मिळाली. मला खूप छान वाटत आहे,’ असे हॉलर हिने लस टोचल्यावर सांगितले. या अभ्यासात आई सहभागी झाल्याचा आनंद तिच्या दोन कुमारवयीन मुलांनीही व्यक्‍त केला.

तिच्यानंतर आणखी तीन जणांना ही लस टोचण्यात आली. यातील एक नील ब्रॉउनिंग (वय ४६) हा मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे. ‘मी या मोहिमेत सहभागी झालो, याचा माझ्या मुलीला अभिमान वाटत आहे,’ असे त्याने सांगितले. या संशोधनात स्वयंफूर्तीने सहभागी झालेल्या ४५ जणांना एका महिन्याच्या कालावधीत दोन डोस देण्यात येणार आहेत. ‘‘संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात या लसीची सुरक्षितता आणि तिचा प्रभाव यातून तपासण्यात येणार आहे,’’ अशी माहिती ‘यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट’चे डॉ. ॲन्थोनी फाउसी यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या लसीवर एवढ्या कमी वेळेत संशोधन केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे.

कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी हे एकमेव संशोधन नाही. अमेरिकेसह जगभरात यावर संशोधन सुरू आहे. ‘इनोव्हिओ फार्मास्युटिकल’ या कंपनीतर्फे पुढील महिन्यात अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियात या विषयावर अभ्यास सुरू होण्याची शक्यता आहे.

लसीबद्दल...

  •   ‘mRNA-1273’ असे सांकेतिक नाव
  •   सहभागींना संसर्गाची लागण होण्याची शक्यता नाही. कारण, त्यांना दिलेल्या लसीमध्ये कोरोना विषाणूचा समावेश नाही
  •   या संशोधनाच्या चाचणीसाठी निवड केलेल्या १८ ते ५५ वर्षांच्या व्यक्तींना लसींची मात्रा जास्त देणार
  •   या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते का, याचे निरीक्षण करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करणार व त्याचे दुष्परिणामही तपासणार
  •   यातील सहभागींना प्रत्येक भेटीसाठी १०० डॉलर मोबदला मिळणार

‘केपीडब्ल्यूएचआरआय’च्या या संशोधनाचे निष्कर्ष सकारात्मक आले, तरी ही लस १२ ते १८ महिन्यांनंतरच सर्वांना उपलब्ध होऊ शकेल.
— डॉ. ॲन्थोनी फाउसी, 
संशोधक, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...