agriculture news in Marathi us parishad of swabhimani on 2 November Maharashtra | Agrowon

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २ नोव्हेंबरला 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. 

कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.१६) दिली. 

गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. 

श्री. शेट्टी म्हणाले, की साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची व कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढावी लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. 

‘‘सध्या सरकारने सिनेमाग्रह, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांनीच १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लॉकडाऊन शिथिल करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली १८ वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व १९ वी ऊस परिषद यशस्वी करावी,’’ असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले , आदिनाथ हेमगीरे, मिलींद साखरपे, अजित पोवार, यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
 


इतर अॅग्रो विशेष
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...