agriculture news in Marathi us parishad of swabhimani on 2 November Maharashtra | Agrowon

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २ नोव्हेंबरला 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. 

कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.१६) दिली. 

गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. 

श्री. शेट्टी म्हणाले, की साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची व कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढावी लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. 

‘‘सध्या सरकारने सिनेमाग्रह, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांनीच १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लॉकडाऊन शिथिल करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली १८ वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व १९ वी ऊस परिषद यशस्वी करावी,’’ असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले , आदिनाथ हेमगीरे, मिलींद साखरपे, अजित पोवार, यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...