अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची अजहरवर बंदीची मागणी

अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची अजहरवर बंदीची मागणी
अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची अजहरवर बंदीची मागणी

न्यूयॉर्क - जैश-ए-महम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्याविरोधात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अजहरवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, असे या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती बघता हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामध्ये अजहरला शस्त्रास्त्रांच्या व्यवहाराला बंदी करण्यात यावी. तसेच जागतिक प्रवासावर बंदी घालावी. आणि त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

चीनची भूमिका महत्त्वाची... चीन व्हेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेकवेळा मसूदविरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केलेला आहे. या पूर्वी देखील 2016 आणि 2017 मध्ये या प्रकारचा मसूद अजहरवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता परंतु, चीनने याचा विरोध केला होता. त्यामुळे आता मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चीन काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com