मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७२ टक्‍क्‍यांवर

usable water storage in Marathwada at 72 percent
usable water storage in Marathwada at 72 percent

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ७२ टक्क्‍यांवर आला आहे. सर्वाधिक संख्येने असलेल्या ७४९ लघुप्रकल्पांत केवळ ४६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ८३ टक्‍के आहे. ११ मोठ्या प्रकल्पांपैकी १०० टक्‍के झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आता ९८ टक्‍क्‍यांवर आला आहे. दुसरीकडे मांजरा व सिनकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त‌ पाण्याचा थेंब नाही. येलदरी प्रकल्प तुडुंब असून सिद्धेश्वरमध्ये ९६ टक्के, माजलगावमध्ये ९७ टक्‍के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ७४ टक्‍के, निम्न तेरणामध्ये ३३ टक्‍के, निम्न मनारमध्ये ९७ टक्‍के, विष्णुपुरीमध्ये ९४ टक्‍के, तर निम्न दुधना प्रकल्पात १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.  

७४९ लघुप्रकल्पांमधील लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील २६८ प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांपुढे आहे. उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांच्या आतच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील २७ लघुप्रकल्पात केवळ २७ टक्‍के, तर उस्मानाबादमधील २०५ लघुप्रकल्पांत केवळ ३३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला असल्याची स्थिती आहे.

नांदेड, परभणी, बीडमध्ये मध्यम प्रकल्पांत ५१ ते ९८ टक्क्यांपर्यंत पाणी

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, या चार जिल्ह्यांतील मध्यम प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांच्या आत आहे. नांदेड, परभणी, बीड, या तीन जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा ५१ ते ९८ टक्क्‍यांदरम्यान असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com