ऊसबिले आठ-दहा दिवसांत देणार ः विनय कोरे

चालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ -दहा दिवसांत देणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी येथे केली.
Usbile will be given in eight to ten days: Vinay Kore
Usbile will be given in eight to ten days: Vinay Kore

वारणानगर, जि. कोल्हापूर : गेल्या ७ वर्षात गाळपास आलेल्या उसास एफआरपी पेक्षा ४११ कोटी रुपये जादा दिले असून उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पाहिला वारणा साखर कारखाना आहे. येत्या गळीत हंगामात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ -दहा दिवसांत देणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी येथे केली.

येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.

श्री. कोरे म्हणाले, गेल्या सहा -सात वर्षांत वारणा कारखान्यावर आर्थिक अरिष्टे आलीत अशा काळातही एफआरपी पेक्षा जादा दर ऊस उत्पादकांना देण्याची परंपरा कायम राखली. केंद्र व राज्य शासनाची विविध कर्जे त्यांची व्याजे यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत सभासद व कर्मचाऱ्यांनी कारखाना माझा, मी कारखान्याचा ही भूमिका ठेवून काम केल्याने या वर्षी साडेनऊ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करू शकलो.

गळीत हंगामातीन ऊस बिले आर्थिक वर्षअखेरीमुळे लांबणीवर पडले आहेत. मात्र, येत्या आठ दिवसांत ही उर्वरित सर्व बिले देणार असल्याचे सांगितले. ४४ मेगावॉटचा व ३२० कोटी रुपयांचा असणाऱ्या ऊर्जाकूर प्रकल्पाचे कर्ज फक्त ४० कोटी रुपये शिल्लक असून लवकरच हा प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा होणार आहे.

७० गावांत ऑनलाइन सभेची सुविधा वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील ७० हून अधिक गावांत ऑनलाइन सभा पाहण्यासाठी सेंटरची व्यवस्था करण्यात आली  त्या-त्या ठिकाणी सभासदांनी उपस्थित राहून ऑनलाइन सभेत सहभाग नोंदविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com