जागतिक तेलबिया उत्पादन घटणार
जागतिक तेलबिया उत्पादन घटणार

जागतिक तेलबिया उत्पादन घटणार

नवी दिल्ली : जागतिक तेलबिया उत्पादन (२०१७-१८) यंदा ५७६.९९ दशलक्ष टन राहील, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये तेलबिया उत्पादन ५७८.६० दशलक्ष टन राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तुलनेत यंदा उत्पादन कमी राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

यूएसडीएने आक्टोबरच्या अहवालात म्हटले आहे, की सोयाबीन उत्पादन ३४७.८८ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या महिन्यात वर्तनविलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात सुमारे सहा लाख टनांनी घट होण्याची शक्यता आहे. सोयाबीन उत्पादनात आघाडीच्या देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेमध्ये १२०.५८ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये येथील सोयाबीन उत्पादनाचा १२०.५९ दशलक्ष टनांचा अंदाज होता.

अमेरिकेनंतर ब्राझील अाणि अर्जेंटिना या देशांचा सोयाबीन उत्पादनात जगात अनुक्रमे दुसरा अाणि तिसरा क्रमांक लागतो. ब्राझील, पराग्वे आणि अजेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादन देशांमधील सोयाबीन निर्यात मात्र आधी अंदाज केल्याप्रमाणेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये ब्राझीलमधून ६४ दशलक्ष टन सोयाबीन निर्यातीचा अंदाज आहे. तसेच जागतिक सोयाबीनचा शिल्लक साठा ९६.०५ दशलक्ष टनांवर आला आहे. सप्टेंबरमध्ये हा साठा ९७.५३ दशलक्ष टन होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com