कृषी तंत्रज्ञानाचा वापर डोळसपणे करा : डॉ. पवार

कृषी तंत्रज्ञानाचा वापर डोळसपणे करा : डॉ. पवार
कृषी तंत्रज्ञानाचा वापर डोळसपणे करा : डॉ. पवार

औरंगाबाद : ‘‘हवामान बदलाचा सामना करण्याचे तंत्रज्ञान कृषिशास्त्रात आहे. फक्त डोळस पणाने वापर करावा,’’ असा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला. 

मागील काही दिवसांपासून हवामनातील चढ- उतार जाणवत आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे. शास्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी एकत्रितपणे पीक पाहणी करत आहेत. या पाहणीतून थेट शेतकरी बांधवाना बांधावर मार्गदर्शन केले. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी  रविवारी कन्नड तालुक्‍यातील विविध गावात  शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन केले. मागील आठवड्यात आलेल्या धुईमुळे कांदा, गहू, ज्वारी, मका, आणि हरभरा या पिकांवर परिणाम झाल्याचे मत निदान चमू पथकाने नोंदविले. 

डॉ. एस. बी. पवार, डॉ. जी. पो. जगताप, डॉ. किशोर झाडे, रामेश्वर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी अशोक अहिरे, आर. व्ही. डोंगरदिवे आदी सहभागी होते. वातावरणात अचानकपणे  वाढलेली आर्द्रता म्हणजेच ओलावा होय. यामुळे हवेत असणारे करपा किंवा इतर बुरशी तसेच जिवाणू यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. वाढ झालेली बुरशी ही त्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या कोवळ्या पिकाच्या भागावर प्रादुर्भाव होऊन त्यांची पुढील उपजीविका त्या भागावर करते. यामुळे पीक पिवळसर पडून पान करपते. उत्पादन घट होण्यास ते मोठे कारण ठरते.

ज्या भागात धुई आली असेल तेथील शेतकरी बांधवानी मॅन्कोझेब म्हणजेच डायथेन एम ४५ हे बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. हातनूर येथील मोसंबी बागेतील मृग बहराच्या फळांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या किडीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल २० ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारणी करावी, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञानी दिला.  

गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव

रब्बी मका पिकाच्या पानावर नोर्दन करपा आढळल्याचे निरीक्षण वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ गजेंद्र जगताप यांनी नोंदविले. तिचे नियंत्रण करण्यासाठी बाविस्टीन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारणी करावी. गहू पिकावर ढगाळ वातावरणामुळे  काही ठिकाणी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. अशा ठिकाणी डायमोथोएट म्हणजेच रोगर २० मिलि १० लिटर पाण्यात फवारणी करावी. टापरगाव येथील शिवारात हरभरा पिकावर घाटे अळी दिसून आली. तिच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफोस २५ ईसी २० मिलि १० लिटर पाण्यात फवारणी करावी, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com