कृषी ज्ञानाचा उपयोग अन्नदात्याच्या भल्यासाठी करा : अर्थमंत्री मुनगंटीवार

कृषी ज्ञानाचा उपयोग अन्नदात्याच्या भल्यासाठी करा
कृषी ज्ञानाचा उपयोग अन्नदात्याच्या भल्यासाठी करा

अकोला : अनेक दिवसांच्या अहोरात्र मेहनतीतून तुम्ही पदवी मिळवली. अाता या मिळवलेल्या कृषी ज्ञानाचा अन्नदात्याच्या भल्यासाठी वापर करा. तसेच नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अावाहन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांनी विद्यापीठासाठी १५१ कोटींची घोषणा केली.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या ३३ व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवारी (ता. ५) ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृषी व फलोत्पादनमंत्री चंद्रकांत पाटील होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, झांसी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, कार्यकारी परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.  मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘शेती व्यवसाय मजबुरीतून मजबुतीकडे नेण्याची गरज अाहे. अाज शेतीचे शिक्षण घेणारे पदवीधरसुद्धा शेतीत जायला तयार नाहीत. प्रत्येकाला अधिकारी, उद्योजक, नोकरदार व्हायचे अाहे, हे अाज मोठे अाव्हान उभे ठाकले अाहे. वास्तविक विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीतून हे ज्ञान प्राप्त केले. त्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हायला हवा. तुम्ही शेती व शेतकऱ्यांसाठी काम करा, शासन कायम तुमच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना केवळ अार्थिक मदत देऊन त्यांच्या अर्थव्यवस्थेत क्रांती होणार नाही. त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. विद्यापीठानेही शेतकऱ्यांना चांगले दिवस कसे येतील यासाठी चिंतन करण्याची गरज अाहे.’’ विद्यापीठासाठी १५१ कोटींची घोषणा भाषणादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला संशोधन व इतर कार्यासाठी १५१ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले. याबाबत कुलगुरूंनी प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठवावा, अशी सूचना केली. या निधीतील ५० टक्के पैसा हा संशोधन, शिक्षणासाठी ठेवावा, असे सांगत चांगले संशोधन झाले पाहिजे अशी अपेक्षा मांडली.     डॉ. भाले यांनी सादर केला अाढावा प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी येथे सुरू असलेले संशोधन, नवीन वाण, शैक्षणिक कार्य, नवीन अभ्यासक्रम याचा अापल्या भाषणातून सविस्तर अाढावा घेतला. विद्यापीठाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू असून, अाजवर विद्यापीठाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने झालेल्या कामासाठी अनेकांचे योगदान महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com