agriculture news in marathi, 'Use BBF technique for sowing' | Agrowon

‘पेरणीसाठी बीबीएफ तंत्राचा वापरा’

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 जून 2019

परभणी : ‘‘कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) तंत्राचा अवलंब करावा,’’ असे आवाहन  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषी विद्यावेत्ता प्रा. डॉ. यू. एन. आळसे यांनी केले.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत धारासुर (ता. गंगाखेड) येथे  शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम होते. तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के, मंडळ अधिकारी मोहनराव देशमुख उपस्थित होते.

परभणी : ‘‘कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) तंत्राचा अवलंब करावा,’’ असे आवाहन  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषी विद्यावेत्ता प्रा. डॉ. यू. एन. आळसे यांनी केले.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत धारासुर (ता. गंगाखेड) येथे  शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम होते. तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के, मंडळ अधिकारी मोहनराव देशमुख उपस्थित होते.

डॉ. आळसे म्हणाले, ‘‘बीबीएफ तंत्राचा पेरणीसाठी अवलंब केल्यास जास्त पाऊस, पावसाचा खंड या दोन्ही परिस्थितीत पिकाची वाढ चांगली होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.’’मस्के यांनी बीज प्रक्रिया, निंबोळी अर्काचा वापर या संदर्भात माहिती दिली. डॉ. कदम यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. 

दरम्यान, शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. कृषी सहायक बालाजी कोरडे यांनी प्रास्ताविक केले. अच्युतराव जाधव यांनी आभार मानले. बी. आर. राठोड, सुशांत जोगळेकर, प्रवीण लोहार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मिरज पूर्व भागाला पाणीपट्टी भरूनही पाणी...आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी...
लालपरीतून हापूस पोचला औरंगाबादलाराजापूर, जि. रत्नागिरी ः लॉकडाऊनमुळे आर्थिक...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जूनपासून...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी बंद...
कोल्हापुरात महावितरणची वीजबिल भरणा...कोल्हापूर : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली...
बाजरीची शासकीय खरेदी सुरू करा,...जळगाव : खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...
मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांची...औरंगाबाद : ‘‘पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची...
नांदेड जिल्ह्यात जागेअभावी दोन...नांदेड : जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय...
पीक विम्याची रक्कम बचत खात्यांत जमा...नाशिक : बॅंकांनी कोरोनाच्या काळात पीक...
हिंगोलीत १० हजार ८६६ शेतकऱ्यांना पीक...हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवार (ता.२२) पर्यंत १०...
केंद्र सरकारच्या पॅकेजच्या निषेधार्थ...नांदेड : शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी तत्काळ...
सटाणा येथे मका खरेदी, विक्रीचे कामकाज...नाशिक : राज्य शासनातर्फे किमान आधारभूत किंमत...
उस्मानाबादमध्ये हरभरा विक्रीसाठी २०...उस्मानाबाद : जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरु...
पत संरचनेवर टाळेबंदीचे परिणाम, उपाय...मुंबई : कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी...
नाशिक : शेतकरी संघटनांच्या...नाशिक : केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे शेती आणि...
खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करुन...अकोला ः या खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते,...
प्रोत्साहनात्मक अनुदान शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या...
राज्यातील कापूस खरेदी पंधरा जूनपर्यंत...मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी...
दापोली : कृषिमंत्री भुसे आज साधणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः दापोली येथील डॉ....
पेठ येथे कृषी मंत्र्यांच्याहस्ते कृषी...बुलडाणा ः अकोला येथील विभागीय खरीप आढावा बैठक...
लोकसहभागातून मैराळडोह येथे पांदण...वाशीम ः सध्या लॉकडाऊन सुरू असून या फावल्या वेळेत...