Agriculture news in Marathi, Use Bed for Paddy plantation, Dr. Shamkunwar | Agrowon

पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान लागवड करा : डॉ. शामकुंवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासोबतच पिकाकरिता ते पोषक ठरावे, याकरिता गादीवाफ्यावर धान लागवड करावी’, असा सल्ला वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुंवर यांनी दिला. 

भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासोबतच पिकाकरिता ते पोषक ठरावे, याकरिता गादीवाफ्यावर धान लागवड करावी’, असा सल्ला वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुंवर यांनी दिला. 

कृषी विज्ञान केंद्र साकोली व महाबीज यांच्या वतीने आयोजित धान महोत्सव, शिवारफेरी व कृषी प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषिभूषण शेतकरी यादोराव मेश्राम, महाबीजचे नागपूर विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गीदमारे, शेतीनिष्ठ शेतकरी चंदूलाल राऊत, आनंद चौधरी, पी. पी. पर्वते, डॉ. पी. बी. खिरारी, एस. के. लाकडे, लयंत अनित्य यांची या वेळी उपस्थिती होती. 

केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. वझिरे यांनी धान पिकावरील प्रमुख किडी व त्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिल. रब्बी पिकामधील हरभरा, तीळ, जवस, लाखोरी, गहू पिकांच्या वाणांची त्यांनी माहिती दिली. महाबीजचे एस. पी. गायकवाड यांनी धानाचे सुधारित वाण पिडीकेवी तीलक, पिकेवी एच. एम. टी., एसकेएल - ९ याविषयी मार्गदर्शन केले. पदमाकर गिदमारे यांनी पारंपरिक शेतीला भाजीपाला पिकाची जोड देत त्या माध्यमातून आपला आर्थिकस्तर उंचावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. 

कार्यक्रमात धान पिकाचे विविध जाती, वाण, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशिनने पेरलेले धान, विविध अवजारे, आवत्या पेरणी मशिन, धानावरील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या विविध जाती, कोंबडीच्या विविध जाती, धरन पीक लागवडीच्या विविध पध्दती याविषयी कृषी प्रदर्शनीमध्ये तंत्रज्ञान माहिती दालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जाणून घेतले. सूत्रसंचालन प्रमोद पर्वते यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...