जिवाणू खतांचा वापर फायदेशीर

जिवाणू खते वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत उपलब्ध करून देतात. जमिनीतील अद्राव्य स्वरूपातील स्फुरद आणि पालाश पिकांना उपलब्ध करून देतात. जमिनीत उपलब्ध असणाऱ्या फायदेशीर जिवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत करतात.
The use of azolla as a green manure in paddy farming is beneficial
The use of azolla as a green manure in paddy farming is beneficial

जिवाणू खते वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत उपलब्ध करून देतात. जमिनीतील अद्राव्य स्वरूपातील स्फुरद आणि पालाश पिकांना उपलब्ध करून देतात. जमिनीत उपलब्ध असणाऱ्या फायदेशीर जिवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत करतात. भूसुधाराकांसोबत जिवाणू खतांचा वापर केल्यास जमीन संवर्धन आणि अधिक पीक उत्पादन यांचे गुणोत्तर साधता येते. जिवाणू खतांचा उपयोग सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आणि जमिनीमध्ये करता येतो.

जिवाणू खतांचे वर्गीकरण  अझोटोबॅक्टर जिवाणू खते या खतातील जिवाणू एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडतात. उदा. गहू, ज्वारी, बाजरी, भात, कापूस इत्यादी

रायझोबियम जिवाणू खते हे जिवाणू खत फक्त शेंगवर्गीय किंवा द्विदल पिकांसाठी उपयोगी असते. विविध पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या गटाचे जिवाणू खत वापरणे गरजेचे असते.  

चवळी गट चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, मूग, गवार इत्यादी रायझोबियम सायसरी
वाटाणा गट वाटाना, मसूर रायझोबियम लेगुमिनिसोरूम
घेवडा गट सर्व प्रकारचा घेवडा रायझोबियम फ्याजीओलाय

सोयाबीन गट

सोयाबीन रायझोबियम जापोनिकम
बरसीम गट बरसीम रायझोबियम ट्रायफोली

निळे हिरवे शेवाळ हे शेवाळ पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीत असलेला नत्र स्थिर करण्याचे काम करते.

अझोला

  • हिरवळीचे खत म्हणून पिकामध्ये वापर केला जातो. पहिल्या पद्धतीमध्ये अझोला विशिष्ट प्रकारच्या वाफ्यात वाढवून भात पेरणीपूर्वी एक महिना आधी शेतात मिसळला जातो. १० ते १५ दिवसानंतर तिथेच गाडला जातो.
  • दुसऱ्या पद्धतीमध्ये अझोला नर्सरी मध्ये वाढविला जातो. भात लागणीनंतर १० दिवसांनी शेतात टाकून कोळप्याच्या सहाय्याने जमिनीत गाडतात.
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत 

    या जिवाणू खतांचा वापर सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आणि जमिनीमध्ये करता येतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची कमतरता असल्याने तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता १६ ते २० टक्के असल्याने स्फुरद विरघळविणारे जिवाणू खतांची शिफारस केली आहे. या जिवाणू खतांचा वापर केल्याने स्फुरद पुरविणाऱ्या रासायनिक किंवा सेंद्रिय खतांद्वारे पुरविले जाणारे स्फुरद उत्तम प्रकारे पिकांना मिळते. या जिवाणू खतांमुळे जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध होऊन पिकांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. जिवाणू खते वापरण्याची मात्रा

    जिवाणू खत पीक मात्रा (प्रती किलो बियाणे)
    अझोटोबॅक्टर गहू, ज्वारी, बाजरी, भात, कापूस इत्यादी २५ ग्रॅम
    रायझोबियम सोयाबीन, चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, मूग, गवार २५ ग्रॅम
    स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत सर्व पिकांकरिता २० ग्रॅम

    जिवाणू खते वापरण्याची पद्धत  एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २०० ते २५० ग्रॅम जिवाणू खत मिसळावे. ताडपत्रीवर १० ते १२ किलो बियाणे पसरून त्यावर जिवाणू खतांचे द्रावण शिंपडावे आणि हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून २४ तासांच्या आत पेरावे. जिवाणू खतांचे फायदे

  • वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत उपलब्ध करून देतात.
  • जवळपास २५ ते ३० किलो नत्र स्थिर करण्यास मदत.
  • जमिनीतील अद्राव्य स्वरूपातील स्फुरद आणि पालाश पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत. जमिनीतील सेंद्रिय द्रव्यांची वाढ होण्यास मदत.
  • जमिनीतील फायदेशीर जिवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवून सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत करतात.
  • जमिनीत असणारे अन्नद्रव्य सहजरीत्या पिकांना उपलब्ध करून देतात.
  • वरखते आणि भरखते यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात. खर्चात बचत होण्यास मदत होते.
  • जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी 

  • जिवाणू खताचे पाकीट थंड व कोरड्या जागी तसेच कीटकनाशक, बुरशीनाशक व जंतुनाशक यांच्यापासून दूर ठेवावे.
  • - जिवाणू खतांच्या पाकिटावर दिलेल्या अंतिम तारखेपर्यंतच वापर करावा.
  • जिवाणू खत वापरण्यापूर्वी, बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करावी.
  • बियाण्यास कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा जंतुनाशकाचा वापर केला असल्यास जिवाणू संवर्धनाची मात्रा दीड पट घ्यावी.
  • कोणत्याही रासायनिक खतासोबत जिवाणू संवर्धन मिसळू नये.
  • संपर्क - डॉ. नितीन कोंडे, ९८२२८७५३७५ (मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com