Use of calcium propionate in the diet of milch animals​
Use of calcium propionate in the diet of milch animals​

दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम प्रोपिओनेट चा वापर

जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी कॅल्शिअम प्रोपिओनेटचा वापर फायदेशीर ठरतो.खाद्यातील पोषणतत्त्वांचे मूल्य राखले जाते.

जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी कॅल्शिअम प्रोपिओनेटचा वापर फायदेशीर ठरतो.खाद्यातील  पोषणतत्त्वांचे मूल्य राखले जाते. संक्रमण काळातील गाई, म्हशींसाठी कॅल्शिअम आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून वापर उपयुक्त ठरतो. याचा वापर पशूतज्ज्ञांच्या सल्याने करावा.  सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने हवेमध्ये आद्रता जास्त प्रमाण दिसून येते. पशुपालक जनावरांसाठी  योग्य प्रमाणात खाद्य घेऊन ठेवतात. परंतु बहुतेक वेळा या खाद्यामध्ये बुरशीची वाढ होते. त्यामुळे खाद्यामध्ये अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण वाढते. असे खाद्य जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.  दुग्ध ज्वरामध्ये जनावरांत कॅल्शिअम आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. ज्यामुळे गाई,म्हशींचे दूध उत्पादन कमी होते. अशा वेळेस कॅल्शिअम प्रोपिऑनेटचा खाद्यामध्ये वापर फायदेशीर ठरू शकतो.

  • कॅल्शिअम प्रोपिओनेट हे प्रोपिओनिक ॲसिड चे कॅल्शिअम सॉल्ट आहे. कॅल्शिअम हायड्रॉक्साईड आणि प्रोपियोनिक ॲसिडची प्रक्रिया झाल्यावर हे सॉल्ट तयार होते. हे कंपाउंड आपल्याला पावडर, द्रव आणि कॉम्प्रेस्ड स्वरूपात बाजारात उपलब्ध मिळते. ही एक फ्री-फ्लोइंग पावडर आहे, जी खाद्यामध्ये सहजपणे मिसळते. यास विशिष्ट असा वास येत नाही. खाद्याची टिकवण क्षमता वाढते. जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी याचा उपयोग फायदेशीर ठरतो.
  • खाद्यातील पोषणतत्त्वांचे मूल्य राखले जाते. संक्रमण काळातील गाई, म्हशींसाठी कॅल्शिअम आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून वापर.
  • गाई,म्हशींमधील दुग्धज्वर टाळण्यासाठी उपयोगी ठरते.
  • मुरघासामध्ये बुरशीची वाढ होत नाही.
  • वासरांमध्ये कोठीपोट (रूमेन) विकसित होण्यासाठी तसेच वाढीसाठी फायदेशीर.  
  • कॅल्शिअम प्रोपिओनेटचे कार्य 

  • खाद्यामध्ये कॅल्शिअम प्रोपिऑनेट सूक्ष्मजंतूंना टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा तयार होऊ देत नाही. ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते. 
  • जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शिअम प्रोपिऑनेट गेल्यावर ते कॅल्शिअम आयन आणि प्रोपिऑनेट मध्ये विभाजित होते. परिणामतः रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. यामुळे आपण कॅल्शियम प्रोपिऑनेट चा उपयोग दुग्ध ज्वर उपचारामध्ये देखील करू शकतो. 
  • शुष्क पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. ज्यामुळे कोठीपोटातील (रूमेन)  व्होलाटाईल फॅटी ॲसिडच्या प्रमाणात वाढ दिसून येते. प्रोपिऑनेट हे जनावरांमध्ये ग्लुकॉनिओ जेनिक प्रीकर्सर म्हणून काम करते. त्यापासून ग्लुकोजची निर्मिती होत असल्या कारणाने जनावरांना ऊर्जा मिळते. परिणामतः जनावरांमधील निगेटिव्ह एनर्जीचा प्रश्न सुटतो आणि किटोसिस (ग्लुकोज च्या अभावामुळे निर्माण होणारी एक अवस्था) तसेच फॅटी लिव्हर चे प्रमाण कमी होते. 
  • प्रोपिऑनिक ॲसिड च्या जिवाणूनाशक गुणधर्मांमुळे मुरघासातील बुरशीचे तसेच अन्य जिवाणूंचे प्रमाण कमी होते, यामुळे मुरघास किंवा टोटल मिक्स रेशनची गुणवत्ता योग्य राहते. परिणामी पोषणमूल्यांचा ऱ्हास होत नाही.
  • पोषणमूल्ये जास्त प्रमाणात उपलब्ध राहिल्यामुळे जनावरांची तब्येत व एकंदरीत दुग्धोत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. 
  • वासरांमध्ये कोठीपोटामधील एपिथेलियमची वाढ होण्यासाठी देखील प्रोपिऑनेट हा महत्त्वाचा घटक ठरतो. पोषण मूल्यांचे शोषण शरीरात चांगल्या प्रकारे केले जाते, त्यामुळे वासरांची वाढ चांगली होते.
  • संपर्क- डॉ. अक्षय वानखडे  ८६५७५८०१७९, (लेखक पशू आहार तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com