Agriculture news in marathi The use of chemical fertilizers increased in Amalner | Agrowon

अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

वावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास ६७ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.युरियासह इतर खतांचा वापर दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची स्थिती आहे.

वावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास ६७ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी मागील पाच वर्षे स्थिर आहे. परंतु, युरियासह इतर खतांचा वापर दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची स्थिती आहे.

मजुरी, खतांवरचा खर्च वाढत असतानाच शेतमालास दर नाहीत. यंदा कोरोनाचे सावट आहे. शेती नुकसानीत जाईल की कापसाला चांगले दर मिळतील, अशी चर्चा गावात पारावर, शेतकऱ्यांमध्ये रंगत आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडत आहे. कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मूग, उडीद, तूर व सोयाबीन पिकांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीद्वारे पिके हवेतील नत्र शोषून घेतात. त्यामुळे त्यांना नत्र खते देण्याची आवश्यकता भासत नाही. कपाशीला आवश्यकतेप्रमाणे युरिया देणे गरजेचे असते. त्यामुळे पिके जोमदार होतात व उत्पादन वाढते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे तालुक्यात कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना अनावश्यक युरिया खत दिले जात असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा युरियाची टंचाई मोठी होती. खत विक्रेत्यांकडे रांगा लागत होत्या. शेतकरी त्रस्त झाले. परंतु, युरियाचा वापर वाढला. कृषी विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात दरवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत जवळपास २१ हजार टन खतांचा वापर झाला आहे. या वर्षी सुरवातीलाच २० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून, शेतकरी युरियाची मागणी करीत आहेत. युरियासह इतर खतांचा वापर वाढला आहे. मागणी अधिक असली तरी खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

अमळनेर तालक्यात रासायनिक खतांचा वारेमाप वापर होत आहे. दिवसेंदिवस उत्पादकता व जमिनीचा पोत खराब होत आहे. याबाबत कृषी विभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत कुठलेही मार्गदर्शन अथवा सल्ला मिळत नसल्याने दिवसेंदिवस खतांचा वापर वाढत आहे, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...